21 October : विवाहाचे मोठे रहस्य

Alethia4India
Alethia4India
21 October : विवाहाचे मोठे रहस्य
Loading
/

म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.” हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे. (इफिस 5:31-32)

येथे इफिस 5:31 मध्यें पौल उत्पत्ति 2:24 चा संदर्भ घेत आहे, जे मोशे बोलला – आणि येशूनें म्हटलें कीं ही वचनें मोशेद्वारे देव बोलला (मत्तय 19:5) – “ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” पौल म्हणतो कीं देवाचे हे वचन, जे देव मनुष्याचे पापात पडण्यापूर्वी बोलला, ख्रिस्त आणि मंडळीला संबोधून आहे आणि म्हणून यांत एक मोठे रहस्य दडलेलें आहे.

याचा अर्थ असा आहे कीं जेव्हां देवानें पुरुष आणि स्त्री यांना बनवलें आणि विवाहाद्वारे त्यांनी एकदेह व्हावें हे ठरविलें, तेव्हा त्यानें फासा टाकून किंवा एक रुपयाचे नाणें हवेत फेकून ते एकमेकांशी कसे संबंधित असावेंत असा नशिबी खेळ खेळला नाहीं. देवानें आपला पुत्र आणि मंडळी यांच्यातील नातेसंबंधाचा नमुना सादर करून अतिशय हेतुपुरस्सर विवाहाचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे, ज्याची योजना त्यानें जगाचा पाया घालण्यापूर्वी केलीं होती.

म्हणून, विवाह हे रहस्य मोठे आहे – आपण जे बाह्यरूपाने पाहतो त्यापेक्षा कितीतरी मोठा असा गूढ अर्थ त्यात सामावलेला आहे. देवानें पुरुष आणि स्त्री यांना बनवलें आणि विवाह संस्थेची स्थापना केलीं ती यासाठींच कीं ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्यातील सार्वकालिक करार-बद्ध नात्याचे प्रतिबिंब त्यांच्या वैवाहिक एकदेहाद्वारे दिसून यावें.

पौलानें या रहस्यातून काढलेला निष्कर्ष असा कीं वैवाहिक जीवनांत पती-पत्नींची एकमेकांप्रत असलेली कर्तव्यें ही अहेतुकपणाने किंवा स्वैराचाराने ठरवली जात नाहींत, तर ती ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांची एकमेकांप्रत असलेली अद्वितीय कर्तव्यें यांत मुळावलेली आहेत.

आपल्यांपैकीं जे विवाहित आहेत त्यांनी वारंवार यावर चिंतन करण्याची गरज आहे कीं आपण आपल्या वैवाहिक जीवनातून वैवाहिक संबंधात असलेल्या आपल्यापेक्षा प्रचंड मोठ्या आणि महान अशा अद्भुत दैवीय वास्तविकतेचे प्रतिबिंब दाखवावे असा विशेषाधिकार देव आपल्याला देतो ही गोष्ट किती रहस्यमय आणि आश्चर्यकारक आहे.

हेंच ते ख्रिस्त आणि मंडळी यांचे रहस्यमय नाते आहे जे आमच्यासाठीं प्रीतिच्या नमुन्याचा पाया आहे ज्याविषयी पौल बोलत आहे. प्रत्येक जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधला पाहिजे असे म्हणणें पुरेसे नाहीं. हे खरे आहे. पण ते पुरेसे नाहीं. हे सांगणें देखील तितकेच महत्त्वाचे आहे कीं पती-पत्नींनी आपल्या वैवाहिक जीवनातून जाणीवपूर्वक ख्रिस्त आणि मंडळी यांच्यासाठीं देवानें ठरविलेल्या नातेसंबंधाचे प्रतिबिंब प्रदर्शित केलें पाहिजे. म्हणजेंच, प्रत्येक जोडप्याने ख्रिस्त आणि मंडळीसाठीं देवानें तयार केलेंल्या शुद्ध आणि आनंदी आलेखाच्या विशिष्ट नमुन्यानुसार आपले वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपण अविवाहित असा अगर विवाहित, वृद्ध असा अगर तरुण, मला आशा आहे कीं तुम्हीं हे गांभीर्याने घ्याल. करार-पाळणारा ख्रिस्त आणि त्याचा करार-पाळणारी मंडळी यांच्या रहस्याचे प्रकटीकरण त्यावर टिकलेले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *