“माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य.” (मत्तय 5:11)
“तथापि भुतें तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानूं नका; तर तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत ह्याचा आनंद माना.” (लूक 10:20)
येशूनें या शास्त्रपाठांत एक असें रहस्य प्रकट केलें जें आपल्या आनंदाचे दुःखाच्या भीतीपासून आणि यशाच्या गर्वापासून संरक्षण करते. आणि तें रहस्य म्हणजे हें: स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे. आणि त्या प्रतिफळाचें मूल्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या गौरवाचा पूर्णानंद घेणें (योहान 17:24).
जेव्हां येशू असें म्हणतो,
“माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचें वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे; कारण तुमच्यापूर्वीं जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनीं तसाच छळ केला” (मत्तय 5:11-12),
तेव्हां तो दुःखापासून आपल्या आनंदाचें संरक्षण करतो.
स्वर्गांत असलेलें आपलें मोठें प्रतिफळ आपल्या आनंदाला मनुष्यांकडून होणारा छळ आणि निंदा यांपासून भयमुक्त करते.
जेव्हां तो असें म्हणतो,
“तथापि भुतें तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानूं नका; तर तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत ह्याचा आनंद माना” (लूक 10:20),
तेव्हां तो यशाच्या गर्वापासून सुद्धा आपल्या आनंदाचे संरक्षण करतो.
शिष्य आपला आनंद सेवेंत मिळालेल्या त्यांच्या यशांत शोधत होतें. “आपल्या नावानें भुतें देखील आम्हांला वश होतात!” (लूक 10:17). पण त्यामुळें त्यांचा खरा आनंद जो एकमेव अशा स्थिर व अढळ नांगराला बांधलेला आहे, त्यापासून तुटला असता.
म्हणून, येशू स्वर्गांत असलेल्या त्याहूनही मोठ्या प्रतिफळाचे अभिवचन देऊन यशाच्या गर्वापासून त्यांच्या आनंदाचे संरक्षण करतो. आनंद मानायचांच असेल तर ह्याचा माना: तुमची नांवे स्वर्गांत लिहिलेलीं आहेत. तुमचा वारसा आकलना पलीकडे, सार्वकालिक, स्थिर व अढळ आहे.
आपला आनंद सुरक्षित आहे. दु:ख असो वा यश, यांपैकीं कांहीच त्यां नांगराला नष्ट करू शकत नाहीं. स्वर्गांत तुमचें प्रतिफळ मोठें आहे. तिथे तुमचे नांव लिहिलेलें आहे. ते एकदम सुरक्षित आहे.
येशूनें दु:ख भोगत असलेल्या आपल्या पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर स्वर्गांत असलेल्या प्रतिफळाच्या समुद्रांत टाकला आहे. आणि तसेंच, यशस्वी पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर देखील त्यानें तिथेंच टाकला आहे.
आणि अशा प्रकारे, त्यानें आपल्याला ऐहिक पीडा आणि ऐहिक सुख – ऐहिक दुःख आणि ऐहिक यश, यांच्या जुलूमशाहीपासून बंधमुक्त केलें.
Thanks a lot for this nice scripture