“हें मीं मनांत आणितों म्हणून मला आशा आहे. आम्हीं भस्म झालों नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेंत खंड पडत नाहीं.” (विलापगीत 3:21-22)
आशेचा एक मोठा शत्रू म्हणजे देवाच्या अभिवचनांचा विसर पडणें. आठवण करून देणें ही एक मोठ्या जबाबदारीची सेवा आहे. पेत्र व पौल हें दोघेंहि म्हणतात कीं त्यांनी त्यांची पत्रें आठवण करून देण्याच्या उद्देशानेंच लिहिलींत (2 पेत्र 1:13; रोमकरांस 15:15).
आपल्याला जें ठाऊक असणें आवश्यक आहे तें सर्वकांही आठवण करून द्यावायांस आपला प्रमुख कैवारी हा पवित्र आत्मा आहे (योहान 14:26). परंतु याचा अर्थ असा नाहीं कीं तुम्हीं निकामी बसून रहावें. तुमच्यावर केवळ तुम्हां स्वतःला आठवण करून देण्याच्या सेवेची जबाबदारी आहे. आणि सर्वांत पहिली व्यक्ती जिला तुम्हीं आठवण करून देण्याची गरज आहे, ती तुम्हीं स्वतः आहां.
मनाचें सर्वांत मोठें सामर्थ्य हें आहे: ते आठवण करून देऊन स्वतःशी संवाद साधू शकते. जसं कीं शास्त्रपाठ सांगते, आपलं मन स्वतःहून गोष्टींना “मनांत आणूं” शकते: “हें मीं मनांत आणितों म्हणून मला आशा आहे. आम्हीं भस्म झालों नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेंत खंड पडत नाहीं.” (विलाप 3:21-22).
देवानें स्वतःविषयीं आणि आपल्यांविषयीं जें कांही सांगितलें आहे तेंच जर आपण “मनात आणत नाहीं” तर आपण अशक्त किंवा क्षीण होऊं. अरे, मला इतक्या वेदनादायक अनुभवांतून गेल्यावर हें कसें समजलें! तुमच्या स्वतःच्या मनांत उद्भवणाऱ्या अधर्मी विचारांच्या चिखलांत लोळत बसूं नका, म्हणजे असे विचार: “हें तर माझ्यासाठीं अशक्य आहे. . .” “ती तें करणार नाहींच. . .” “तीं माणसें तें कधीच करूं शकणार नाहींत. . .” “यांत कधीच यश मिळालें नाहीं. . .”
यां सबबी खऱ्या कीं खोट्या, मुद्दा हा नाहीं. पण जोपर्यंत तुम्हीं यां गोष्टींपेक्षाहि मोठं असं कांहीतरी तुमच्या “मनांत आणित” नाहीं, तोपर्यंत तुमचं मन मात्र यां सबबी खऱ्याच आहेत हें दाखवीण्याचा नेहमीच कुठलातरी मार्ग शोधेल. देव हा सर्व गोष्टींना शक्य करणारा देव आहे. कठीण परिस्थितींतून पळ काढण्यापेक्षा देव अशक्य गोष्टी करतो याची स्वतःला आठवण करून देणें अधिक सार्थक ठरेल.
आपण जर स्वतःला देवाची महानता आणि कृपा आणि सामर्थ्य आणि शहाणपण याची आठवण करून देत नाहीं, तर मग आपण पिळून टाकणाऱ्या क्रूर निराशेंत बुडतो. “मी तर मूढ व अज्ञानी होतों; तुझ्यापुढें मी पशुवत होतों” (स्तोत्र 73:22).
स्तोत्र 77 मध्ये निराशेंकडून आशेकडे जें मोठें वळण येतें तें यां शब्दांमध्यें: “मी परमेशाचीं महात्कृत्यें वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचें स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचें मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन” (स्तोत्र 77:11-12).
हें माझ्या जीवनांतील सर्वांत मोठें युद्ध आहे. आणि तुमचेंहि हेंच युद्ध असेल असें मी गृहीत धरतों. आठवण करून देण्याचें युद्ध! प्रथम स्वतःला. त्यानंतर दुसऱ्यांना.