2 October : देव सनकी (मूडी) नाहीं

Alethia4India
Alethia4India
2 October : देव सनकी (मूडी) नाहीं
Loading
/

राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. (स्तोत्र 33:10-11)

“आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3). या शास्त्रलेखाचा अर्थबोध हा आहे कीं देवाला ज्या गोष्टींमध्यें आनंद मिळतो त्यां सर्व करण्याचा त्याला अधिकार आणि  सामर्थ्य आहे. देव सार्वभौम आहे या कथनाचा अर्थ हाच आहे.

काहीं क्षण यावर विचार करा : जर देव सार्वभौम आहे आणि त्याच्या इच्छेस येईल ते सर्व करण्यांस तो समर्थ आहे, तर त्याचा कोणताही संकल्प निष्फळ होऊ शकत नाहीं. “राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात” (स्तोत्र 33:10-11).

आणि जर त्याचा कोणताही संकल्प निष्फळ होऊ शकत नाहीं, तर तो सर्व जीवितांमध्यें सर्वात अधिक आनंदी असला पाहिजे.

हाच असीम, ऊर्ध्वलोकीं आनंद तो झरा आहे ज्यातून ख्रिस्ती हेडोनिस्ट म्हणजें सुख हेच अंतिम उद्दिष्ट हा सिद्धांत मानणारा मनुष्य सातत्यानें पितो आणि जो अधिक खोलवर जाऊन प्यावयांस तळमळतो.

जगावर राज्य करणारा देव आनंदी नसता तर काय झालें असते याची तुम्हीं कल्पना करू शकता का? देव जर आकाशातल्या एखाद्या दैत्याप्रमाणें कुरकुर करणारा, चिडचिडपणानें वेडापिसा होणारा आणि दु:खाने खिन्न होऊन बसणारा असता तर? जर देव निराश, वैफल्यग्रस्त, खिन्न आणि हताश आणि असमाधानी आणि विषादपूर्ण वृत्तीचा असतां तर?

आपण दाविदाबरोबर असे म्हणू शकलो असतो का, “हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठीं तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे” (स्तोत्र 63:1)? मला असे वाटत नाहीं.

आपण लेकरें म्हणून परमेश्वराला असे गणूं जसे एक निराश झालेला, खिन्न आणि हताश, व असंतुष्ट असा बाप असलेलीं बालकें त्याला गणतील. ते त्याच्यामध्यें आनंद करूं शकत नाहींत. ते फक्त त्याला त्रास न देण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा कदाचित थोड्याफार स्वार्थासाठीं त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करतील.

पण आमचा परमेश्वर तसा नाहीं. तो कधीही नैराश्याने किंवा असमाधानामुळें लहरी माणसासारखा चिडत नाहीं. आणि, स्तोत्र 147:11 मध्यें सांगितल्याप्रमाणें, “जे परमेश्वराचा आदर करतात,जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.” म्हणून या देवाला टाळणें, वा त्याच्यापासून पळ काढणें किंवा त्याचा खिन्नपणा क्रोधाद्वारे प्रकट होऊ नये म्हणून दिवाणखान्यात डोकावून सुद्धा न पाहणें हा ख्रिस्ती हेडोनिस्टचा उद्दिष्ट नाहीं. नाहीं, उलट त्याच्या स्थिर प्रीतिची आशा धरणें हे आपले उद्दिष्ट असते. त्याच्याकडे धाव घेणें हे आपले उद्दिष्ट असते. देवामध्यें आनंद करणें, देवामध्यें हर्ष करणें, त्याचा सहवास आणि त्याची कृपा यांना आपल्या हृदयांत जपणें व त्यांत आनंद करणें हे आपले उद्दिष्ट आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *