“पाहा, देव थोर आहे, तो आम्हांला अगम्य आहे; त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे.” (ईयोब 36:26)
देवाला अतिशय चांगल्याप्रकारे जाणणें किंवा ओळखणें अशक्य आहे.
तो अस्तित्वात असलेला सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहे. आणि याचे कारण हे कीं त्यानें इतर सर्वांना घडविले, आणि त्यांना जर कुठले महत्व असेल तर ते त्याच्यामुळें आहे.
इतर जिवांस जे बळ अथवा बुद्धी अथवा कौशल्य अथवा सौंदर्य मिळाले आहे ते सर्व त्याच्याकडून येते. उत्तमतेच्या प्रत्येक पातळीवर, तो तुम्हीं ओळखत असलेल्या किंवा ज्याच्याविषयी तुम्हीं ऐकलें आहे अशा सर्वोत्तम व्यक्तीपेक्षा अमर्यादपणें श्रेष्ठ आहे.
अनंत, अपरंपार असल्याने, त्याच्यांत असलेली चित्तवेधकता अमर्याद आहे. म्हणून देव कंटाळवाणा असणें अशक्य आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण आणि चित्तवेधक कृत्यांचे त्याचे सतत प्रदर्शन स्फोटक आहे.
प्रत्येक उत्तम आनंदाचा उगम म्हणून, तो स्वतःमध्यें पूर्णपणें आणि कायमचा प्रसन्न राहतो. जर आपण त्याला तशाप्रकारे ओळखत नाहीं, तर आपण एकतर मृत आहोत, अथवा आंधळे आहोत किंवा निद्रेत चालत आहोत.
म्हणून या जगात परमेश्वरास जाणून घेण्यासाठीं किती कमी कष्ट केलें जातांत ही बाब म्हणजें धक्कादायकच.
हे जणू काहीं असे आहे कीं देशाचे राष्ट्रपती तुमच्यासोबत महिनाभर राहाण्यासाठीं आलें आणि तुम्हीं दररोज येता जाता त्यांना फक्त सलाम म्हणतां. किंवा जणूकाहीं तुम्हीं प्रकाशाच्या गतीने काहीं तास सूर्य आणि सौरमंडलाभोवती उडत होता, आणि खिडकींतून बाहेर पाहण्याऐवजी तुम्हीं कंप्यूटर गेम खेळत बसला. किंवा जणूकाहीं तुम्हांला सर्वोत्कृष्ट अभिनेते, गायक, क्रीडापटू, संशोधक आणि विद्वान लोकांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पाहण्यासाठीं आमंत्रित करण्यात आलें होते, परंतु तुम्हीं जाण्यास नकार दिला, यासाठीं कीं तुम्हांला टीव्ही वरील तुमच्या आवडत्या मालिकेचा शेवटचा भाग पाहता यावा.
आपण एकत्र मिळून प्रार्थना करू या कीं आपला अमर्यादितरित्या थोर परमेश्वर त्याला आम्हास शक्य तितके पूर्णपणें पाहता यावें आणि त्याला आणखी जाणून घेण्यासाठीं त्याचा शोध घ्यावा म्हणून त्यानेंच आमचे अंतःकरण वळवावे, आणि आमचे डोळे उघडावे.