“माझा जीव प्रभूला’ थोर मानतो, आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळें माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’ कारण ‘त्यानें’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केलें आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील! कारण जो समर्थ आहे, त्यानें माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत; आणि ‘त्याचे नाव पवित्र आहे.’ आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’ त्यानें आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्यानें दाणादाण केली आहे.’ ‘त्यानें अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केलें आहे.’ ‘त्यानें भुकेलेंल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केलें आहे,’ व ‘धनवानांस रिकामे लावून दिलें आहे.’ ‘आपल्या पूर्वजांस’ त्यानें सांगितले ‘त्याप्रमाणें अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून त्यानें आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केलें आहे.” (लूक 1:46-55)
मरीया देवाविषयी स्पष्टपणें एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट पाहते: तो संपूर्ण मानव इतिहासाचा क्रम बदलणार आहे; इतिहासातील अत्यंत महत्वाची तीन दशके सुरू होणार आहेत.
आणि देव कोठे आहे? तो आपलें सर्व लक्ष अप्रसिद्ध व दीन अशा दोन स्त्रियांवर केंद्रित करतो – एक म्हातारी आणि वांझ (अलीशिबा), एक तरुण आणि कुमारीका (मरीया). आणि मरीया देवाच्या या दृष्टांताने, जो दीनांवर प्रीति करणारा आहे, इतकीं भारावून जाते कीं तिच्या अंतःकरणातून गीत उचंबळून येते – असे गीत ज्यास “मरीयेचे स्तोत्र” म्हटलें जाते.
मरीया आणि अलीशिबा लूकाच्या वृत्तांतातील दोन महान नायिका आहेत. त्याला या दोन स्त्रियांचा विश्वास आवडतो. असें दिसून येतें कीं त्यां दोघींच्या बाबतीत ज्यां गोष्टीचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडला, आणि जी गोष्ट तो त्याच्या शुभवर्तमानाचा कुलीन वाचक थियोफिलस याच्या मनावर ठसवू इच्छितो ती गोष्ट आहे अलीशिबा आणि मरीया ज्या त्यांच्या प्रतापी देवाला समर्पित होतात त्याबाबतीत त्यांचा दीनपणा आणि हर्षयुक्त नम्रपणा.
अलीशिबानें म्हटलें, (लूक 1:43) माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडें यावे हा मान मला कोठून? आणि मरीयेनें म्हटलें (लूक 1:48) “त्यानें’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केलें आहे”
ज्यांचा जीव खरोखर प्रभूला थोर मानतो असें एकमेव लोक अलीशिबा आणि मरीयेसारखे लोक आहेत – जे लोक त्यांची दीन दशा कबूल करतात आणि प्रतापी देवाच्या नम्रतेने भारावून जातात.