
कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेंला नाहीं; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. (इफिस 5:29-30)
ती शेवटची अभिव्यक्ती चुकवू नका : “कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत.” आणि पौलाने अगदी दोन वचनांपूर्वी जे म्हटलें ते विसरू नका, ते हे कीं ख्रिस्तानें स्वतःस आपल्यासाठीं समर्पण केलें, अशासाठीं कीं “गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी.” अशाप्रकारे पौल ही गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने मांडून हे स्पष्ट करतो कीं ख्रिस्तानें आपल्या लोकांना पवित्र करून, त्यांना सुशोभित करून व त्यांना आपला आनंद देऊन स्व:ताचा आनंद साध्य केला आहें.
ख्रिस्त आणि त्याची वधू यांच्यातील नाते इतके घनिष्ठ आहे (“एकदेह”) कीं तो जे काहीं चांगले तिच्यासाठीं करतो ते जणू त्यानें स्वतःसाठीं केलेंले सत्कर्म ठरते. याचा अर्थ असा कीं, परमेश्वर आपल्या वधूचे पालनपोषण, भरण-पुरण, पवित्रीकरण आणि शुद्धीकरण करण्यास प्रवृत्त होतो ते यासाठीं कारण यातच त्याचा आनंद आहे असेच हा शास्त्रपाठ स्पष्टपणें अभिव्यक्त करत आहे.
आपण जर काहीं लोकांच्या व्याख्यांवर दृष्टि टाकली, तर त्यांच्यामते ही प्रीति असू शकत नाहीं. ते म्हणतांत, प्रीति ही स्वार्थ शोधापासून मुक्त असली पाहिजे – विशेषतः जशी प्रीति ख्रिस्तानें केलीं ती, विशेषत: कॅल्व्हरी वर प्रकट झालेंलीं प्रीति. प्रीतिची अशी व्याख्या जी पवित्र शास्त्राच्या या पाठाबरोबर सुसंगत होईल, मी कधीही पाहिली नाहीं.
तरीही ख्रिस्त आपल्या वधूसाठीं जे करतो, ती प्रीति आहे असे हा शास्त्रपाठ स्पष्टपणें उघड करतो : “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा. . . (इफिस 5:25). प्रीतिची व्याख्या नीतीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान यांच्या मदतीने करण्याऐवजी आपण ह्या शास्त्रपाठालाच प्रीतिची व्याख्या करूं दिलीं तर? या शास्त्रपाठानुसार, प्रीति म्हणजें आपल्या प्रेयसीच्या पवित्र आनंदातच ख्रिस्ताचा आनंदाचा शोध (म्हणजें ख्रिस्त त्याच्या वधूच्या शुद्धीकरणात आपला आनंद शोधतो).
तर मग, आत्मकेंद्रीत आनंद आपण प्रीतिपासून विभक्त करावा याचा कोणताही मार्ग नाहीं, कारण आत्मकेंद्रीत आनंद आणि स्वार्थ या दोन्हीं गोष्टीं वेगवेगळ्या आहें. स्वार्थ हा इतरांना तरवारीच्या धारेवर धरून स्वतःचा खाजगी आनंद शोधतो.
ख्रिस्ताच्या प्रीतिसारखी प्रीति ही इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधते – त्यांना तरवारीच्या धारेवर धरून नाहीं. ही अशी प्रीति आहे जी आपल्या प्रेयसीच्या जीवनात आणि पवित्रतेमध्यें तिचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आपल्या प्रियकरासाठीं दुःख सहन करेल आणि मरणही सोसेल.
ख्रिस्ताने आम्हांवर अशीच प्रीति केलीं आणि आपणही एकमेकांवर अशीच प्रीति करावीं यासाठीं त्यानें आपल्याला पाचारण केलें आहें.