19 July : त्याची वेळ अचूक आहे

Alethia4India
Alethia4India
19 July : त्याची वेळ अचूक आहे
Loading
/

तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठीं कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ (इब्री 4:16)

ह्या मूल्यवान वचनाचे मराठीत असलेले भाषांतर अचूक आणि योग्यच आहे, मुख्यत ‘ऐन वेळी’  हे शब्द. हे शब्द संकेत देतांत कीं जेव्हा आपल्याला ‘ऐन वेळी’  देवाची गरज लागते, तेव्हा लगेच तो आमच्या साहाय्यासाठीं धावून येतो. या वचनाचा शब्दशः मुद्दा आहे ‘ऐन वेळी.’

सर्व सेवा ही भावी सेवा असते – एक क्षण दूर, किंवा एक महिना दूर, किंवा एक वर्ष, किंवा एक दशक दूर. त्या दृष्टिने, आपल्या अपुरेपणावर चिंतन करण्यासाठीं आपल्याकडें पुरेसा वेळ आहे. आणि त्या विचाराने जेव्हा आपल्या मनाचा थरकाप उडतो, आपण प्रार्थनेकडें वळले पाहिजे.

प्रार्थना विश्वासाचेच एक स्वरूप आहे जी आपल्याला आजच उद्याच्या सेवेसाठीं समर्थ बनविणाऱ्या कृपेशी जोडते. वेळ खरोखर महत्वाची आहे.

जर ती कृपा वेळेपूर्वी आली किंवा वेळ निघून गेल्यावर आली तर काय होईल? या संदर्भात अत्यंत मौल्यवान असलेल्या वचनाचे इब्री लोकांस 4:16 चे इंग्रजीचे भाषांतर स्पष्ट नाहीं. ते समजण्यासाठीं आम्हांला अधिक शाब्दिक अभिव्यक्ती आवश्यक आहे. आणि ते अभिवचन म्हणजें केवळ “गरजेच्या वेळी साहाय्यासाठीं ” कृपा मिळते असे नाहीं, तर असे कीं कृपा देवऐन वेळी  देतो.

मुद्दा असा आहे कीं प्रार्थना योग्य वेळी सहाय्यासाठीं भावी कृपेचा शोध घेण्याचा मार्ग आहे. देवाची ही कृपा सदैव “कृपेच्या राजासनाजवळ” ऐन वेळी मिळते. “कृपेचे राजासना” या वाक्यांशाचा अर्थ असा आहे कीं भविष्यातील कृपा विश्वाच्या त्या राजाकडून मिळते जो स्वतःच्या अधिकारयुक्त निर्णयाने ती वेळ ठरवतो (प्रेषितांची कृत्ये 1:7).

त्याची वेळ अचूक आणि पूर्ण आहे, परंतु आपल्या सीमित दृष्टीने ती ऐन वेळी प्रकट होणारी अशी कृपा आहे: “[त्याच्या] दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत” (स्तोत्र 90:4). जागतिक स्तरावर, तो राष्ट्रांचा उदय व त्यांच्या पतनाचे समय ठरवितो (प्रेषित 17:26). आणि वैयक्तिक दृष्टीने, “माझे दिवस [त्याच्या]  हाती आहेत” (स्तोत्र 31:15).

आपण भविष्यातील कृपेच्या वेळेबद्दल काळजी करतो तेव्हा आपण “कृपेच्या राजासनावर” जाऊन चिंतन केलेंले बरे. आपल्यासाठीं ती वेळ जर योग्य असेल तर कोणतीही गोष्ट कृपा पाठवण्याच्या देवाच्या योजनेत अडथळा आणू शकत नाहीं. भविष्यातील कृपा नेहमीच ऐन वेळी मिळणारी कृपा आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *