तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. (स्तोत्र 147:15)
आज रात्री आमच्या किचनच्या फ्रीझचे तापमान मिनियापोलिसच्या बाहेरील तापमानापेक्षा चाळीस अंश जास्त गरम असेल. उद्याचे उच्च तापमान शून्यापेक्षा (फॅरेनहाइट) पाच अंश खाली असेल. हे प्रभूकडून आहे.
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो, तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो. तो आपल्या बर्फाचा चुर्याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हां पाणी वाहू लागते. (स्तोत्र 147:15–18)
ती अशी थंडी आहे जिच्याशी तुम्हीं बालिश खेळ खेळत नाही. ती जीव घेणी थंडी आहे.
मी दक्षिण कॅरोलिनाहून मिनेसोटाला आलो तेव्हां मी स्वतःला थंडीपासून वाचविण्यासाठीं गरम कपडे घातले. परंतु माझी कार नादुरुस्त झाल्यांस मला ज्यां जीवन-रक्षक वस्तूंची गरज पडेल त्यां वस्तु मात्र मीं सोबत घेतल्या नव्हत्या.
एका रविवारच्या रात्री मी चर्चमधून घरी परततांना अशाच थंडीत माझी गाडी नादुरुस्त झालीं. तेव्हां सेलफोन नव्हतें. गाडीत माझ्याबरोबर माझी पत्नी आणि दोन लहान मुलं होती.
पण तो रस्ता मात्र निर्जन होता. तेव्हां हा रस्ता धोकादायक असल्याचें माझ्या अचानक लक्षात आले.
आणि लवकरच तो रस्ता खूप धोकादायक असा ठरला, कारण त्या रस्त्याने कोणीहि ये-जा करित नव्हते.
मला दूरवर कुंपणातून एक घर दिसलें. शेवटी मी एक बाप आहे. कुटुंबाची काळजी घेणे हे माझं कर्तव्य. मी कुंपणावरून उडी मारून आंत शिरलो आणि धावत त्यां घराकडे गेलो आणि दरवाजा ठोठावला. तिथें राहणारे घरातंच होते. मी कारमध्ये माझी पत्नी आणि दोन लहान मुले असल्याचे त्यांना सांगितलें आणि ते आम्हांला आत घेतील का अशी मी त्यांना विचारणा केलीं. त्यांनी आम्हांला आंत घेतलें.
ही अशी थंडी आहे ज्यांत तुम्हीं धोका पत्करू शकत नाहीं.
हा असा मार्ग आहे ज्याविषयी देव म्हणतो, “मग गरम असो वा थंड, उंच असो वा खोल, तीक्ष्ण असो वा बोथट, किंचाळणारा असो वा शांत, प्रकाशमान असो वा अंधकारमय . . . माझ्याशी खेळू नकोस. मी देव आहे. या सर्व वस्तूं मी बनवल्या आहेत. जसा उन्हाळ्याचा उबदार वारा, आणि सौम्य पाऊस, आणि रात्रीच्या मंद चांदण्या, आणि तलावाचा काठ, आणि शेतातील फुलें आणि हवेतील पक्षी, तसें तीं मजविषयी साक्ष देतांत.
या थंडीतहि आमच्यासाठीं एक अभिवचन आहे. परमेश्वर आम्हांला स्पर्शजन्य त्वचा आणि ऐकणारे कान देऊ करो.