
पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें, अशासाठीं कीं, तिला त्यानें वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजें तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. (इफिस 5:25-27)
वैवाहिक जीवनात इतकीं दुःखें येतांत ते ह्यामुळें नाहीं कीं पती-पत्नी आपापल्या सुखाच्या शोधांत असतांत, तर ती ह्यामुळें कीं ते आपलें सुख आपल्या जोडीदाराच्या सुखामध्यें शोधत नाहींत. पती-पत्नींना बायबलची आज्ञा ही आहे कीं तुम्हीं तुमच्या जोडीदाराच्या आनंदातच तुमचा स्वतःचा आनंद शोधावा.
इफिस 5:25-30 मध्यें वैवाहिक जीवनाविषयी जो शास्त्रपाठ आहे त्यापेक्षा बायबलमध्यें इतरत्र क्वचितच अशा पूर्णानंदाला संबोधित करणारा शास्त्रपाठ असेल. जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी पतींनीही आपापल्या पत्नीवर प्रीति करावी असे त्यांना येथें सांगण्यांत आलें आहें.
त्यानें मंडळीवर कशी प्रीति केलीं? वचन 25 म्हणते कीं त्यानें “स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें.” पण का? वचन 26 म्हणते, “अशासाठीं कीं, तिला त्यानें वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे.” पण त्याला असं का करावें लागलें? वचन 27 उत्तर देते, “गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी!”
आहाहा! येथें मूळ आहे! “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला” (इब्री 12:2). कसला आनंद? मंडळी, जी त्याची वधू आहे, तिजबरोबर विवाहाचा आनंद. रक्ताने विकत घेतलेली गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी हा आनंद.
डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही असलेली पत्नी स्वतःला सादर करावी असा येशूचा हेतू नव्हतां. म्हणून, तो आपल्या विवाहितेला पवित्र करण्यासाठीं आणि शुद्ध करण्यासाठीं मरण पत्करण्यास तयार झाला जेणेंकरून तो गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करू शकेल. त्यानें आपल्या वधूच्या कल्याणासाठीं दुःख सोसून व स्वतःस तिच्यासाठीं समर्पण करून आपला मनोरथ पूर्ण केला.
मग पौल ख्रिस्ताने जे केलें ते 28-30 या वचनांमध्यें पतींवर लागू करतो: “त्याचप्रमाणें पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करतो तो स्वतःवरच प्रीति करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेंला नाहीं; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, [त्याच्या हाडामांसाचे] आहोत.”
येशूनें पती-पत्नींना – आणि इतर सर्वांना – “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” असे म्हटलें होते (मत्तय 22:39). वैवाहिक जीवन ही आज्ञा पाळण्याचे अद्भुत स्थान आहे. ही आज्ञा फक्त असे म्हणत नाहीं कीं “जेव्हां” तुम्हीं स्वतःवर प्रीति करतां. तर तुम्हीं स्वतःवर प्रीति करतच आहात. जेव्हा तुम्हीं त्या व्यक्तीवर प्रीति करता जिच्याशी देवानें तुम्हाला एक-देह बनवले आहे, तेव्हा तुम्हीं स्वतःवर प्रीति करता. म्हणजेंच, तुम्हीं तुमच्या जोडीदाराच्या सर्वात मोठ्या आनंदाच्या शोध घेऊनच तुमचा सर्वात मोठा आनंद प्राप्त करून घेतां.