त्याअर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांचीं पापें स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदांच अर्पिला गेला, आणि जे त्याची (उत्कंठेनें) वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसर्यांदा दिसेल. (इब्रीलोकांस 9:28)
तुमची पापें ख्रिस्ताच्या रक्तानें दूर केलीं गेलीं आहेत आणि तो दुसर्यांदा दिसेल तेव्हां तो तुम्हांला देवाच्या क्रोधापासून वाचवेल आणि तुम्हांला सार्वकालिक जीवन देईल याची तुम्हांला खात्री पटावी म्हणून तुम्हीं काय करावें? उत्तर असें आहे: ख्रिस्तावरील तुमचा विश्वास असा असूं द्या कीं ज्यामुळें तुम्हीं त्याच्या दुसर्यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहाल.
वरील वचन असें सांगते कीं जे “त्याची उत्कंठेनें वाट पाहतात” त्यांच्या तारणासाठीं तो दुसऱ्यांदा येत आहे. मग तुम्हीं त्यासाठीं कशी तयारी करावीं? देवानें ख्रिस्तामध्यें तुम्हांला तुमच्या पापांची क्षमा केलीं आहे याची जाणीव तुम्हांला कशी होते? आणि त्याला भेटण्यासाठीं तुम्हीं कशी तयारी करता? त्याच्यावर अशा प्रकारे विश्वास ठेवून कीं ज्यामुळें तुम्हीं त्याच्या दुसर्यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहाल.
ख्रिस्ताच्या दुसर्यांदा प्रकट होण्याची अशा आतुरतेनें भरलेलीं प्रतीक्षा म्हणजे या गोष्टीचें प्रमाण आहे कीं आपण त्याच्यावर प्रीति करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो – त्याच्यावर खरा विश्वास, अस्सल विश्वास ठेवतो.
एक बनावटी विश्वास सुद्धा आहे, आणि हा असा विश्वास आहे जो फक्त नरकापासून सुटका करून घेण्याइतकाच मर्यादित असतो, परंतु ख्रिस्तासाठीं त्यांत कोणतीहि उत्कंठा नसतें. अशा प्रकारचा विश्वास तारत नाही. असा विश्वास ख्रिस्ताच्या दुसर्यांदा प्रकट होण्यासाठीं आतुरता निर्माण करत नाही. या उलट, असा विश्वास ठेवणारा मनुष्य ख्रिस्तानें दुसऱ्यांदा येण्यासाठीं शक्य तितका काळ उशीर करावा अशीच अपेक्षा करतो, जेणेंकरुन त्याला या जगाचा जास्तीत जास्त उपभोग घेता यांवा.
परंतु असा विश्वास जो ख्रिस्ताला आपला तारणारा व प्रभू आणि आपले धन आणि आपली आशा व आपला आनंद म्हणून दृढनिश्चयानें धरून ठेवतो तोच हा विश्वास आहे जो आपणांला ख्रिस्ताच्या दुसर्यांदा प्रकट होण्याची आतुरतेनें वाट पाहण्यांस भाग पाडतो. आणि हाच विश्वास आपणांला तारतो.
म्हणून, मीं तुम्हांला विनवितो कीं, या जगाकडे आणि तुमच्या पापांकडे आपली पाठ फिरवा. ख्रिस्ताकडे वळा. त्याचा स्वीकार करा, त्याचें स्वागत करा, ख्रिस्ताला केवळ तुमचा आरोग्य विमा म्हणून नव्हे तर तुमचे असें धन आणि मित्र आणि प्रभु म्हणून कवटाळा ज्याच्या प्रकट होण्याची तुम्हीं मोठ्या उत्कंठेनें वाट पाहत आहां.