16 March : येशू महान कामगिरी पूर्ण करणार

Alethia4India
Alethia4India
16 March : येशू महान कामगिरी पूर्ण करणार
Loading
/

“सर्व राष्ट्रांना साक्षीसाठीं म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हां शेवट होईल.” (मत्तय 24 : 14 )

मला सुवार्ताप्रसाराविषयीं येशूच्या ह्या अभिवचनापेक्षा इतर कोणतेच शब्द प्रेरणादायी वाटत नाहींत.

तो असे म्हणत नाहीं कीं : ही सुवार्ता गाजवली पाहिजे. 

असे म्हणत नाहीं कीं : ही सुवार्ता कदाचित गाजवली जाईल.

पण तो म्हणतो : ही सुवार्ता गाजवली जाईल.

ही महान कामगिरी नाहीं किंवा महान आज्ञा नाहीं. तर ही महान निश्चितता आहे, महान भरवसा आहे.

कोणी अश्याप्रकारे बोलायचे धाडस कसे काय करू शकते? त्याला कसे ठाऊक आहे कीं असेच होईल? त्याला कशी खात्री असू शकते कीं मंडळी सुवार्ता कार्यात अपयशी ठरणार नाहीं?

उत्तर : सुवार्ताप्रसार कार्याची कृपा ही पुनरुज्जीवनाच्या कृपेप्रमाणेच आहे, कोणी त्याचा प्रतिकार करू शकत नाहीं. ख्रिस्त वैश्विक घोषणेचे वचन देऊ शकतो कारण तो सार्वभौम आहे. त्याला भविष्यातील सुवार्ता कार्याच्या यशाबद्दल ठाऊक आहे कारण तोच भविष्य ठरवतो. सर्व राष्ट्रे ऐकतील!

“राष्ट्र” म्हणजे आधुनिक “देश” नव्हे. जुन्या करारात जेव्हां इतर राष्ट्रांचा उल्लेख केला जातो, तेव्हां तें वांशिक लोक गटांबद्दल बोलले गेले आहे, जसे कीं यबुसी, हित्ती, अमोरी, मवाबी, कनानी आणि पलिष्टी. “राष्ट्र” म्हणजे स्वत:ची विशिष्ट भाषा आणि संस्कृती असणारे विविध वंशाचे लोक. ( स्तोत्र 117:1 ) : “सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो, त्याचें स्तवन करा.” राष्ट्र म्हणजे लोक – विविध लोक गट, जसे कीं आपण त्यांना संबोधतो.

देवाचा सार्वभौम पुत्र आणि मंडळीचा प्रभू या नात्यानें, येशूनें हा दैवी उद्देश हाती घेतला आणि संपूर्ण खात्रीने तो बोलला कीं, “सर्व राष्ट्रांना साक्षीसाठीं म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हां शेवट होईल” ( मत्तय 24 : 14 ).

जगाच्या सुवार्ताप्रसाराचे कार्य यशस्वी होणार याबद्दल खात्री दिली गेली आहे. ते अपयशी ठरू शकत नाहीं. मग हे रास्त नाहीं का, कीं आपण मोठ्या विश्वासाने प्रार्थना करू व मोठ्या भरवश्याने गुंतवणूक करू आणि यशाच्या खात्रीने  पुढे वाटचाल करू ?

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *