
भीत व कापत आपलें तारण साधून घ्या; कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे (फिलिप्पैकरांस 2:12-13)
येथे इच्छा करणें व कृती करणें साधून देण्यांत निर्णायक भूमिका करणारा कर्ता स्वतः देव आहे. आपलें तारण साधून घ्या. . . कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं देव स्वतः साधून देतो. आपल्या सत्संकल्पासाठीं देव इच्छा करतो आणि तोच आहे जी ती इच्छेनुकूल कृतीहि साध्य करतो. पण यावर विश्वास करणें म्हणजें ख्रिस्ती विश्वासणारे निष्क्रीय होतांत असा त्याचा अर्थ नाहीं. तर उलट, हे सत्य त्यांना आशावादी आणि सक्रिय कष्टाळू आणि धैर्यवान बनवते.
आम्हीं आपापल्या पाचारणानुसार जी विशिष्ट सेवा करतो त्यांत दररोज आम्हांला कृती करावयाची असते. पौल आपल्याला तीच कृती साधून घेण्यासाठीं काम करायची आज्ञा देतो. परंतु देवानें पुरवलेल्या सामर्थ्याने ती कशी करावी हे तो आपल्याला सांगतो: त्याच्यावर विश्वास ठेवा! आज इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्याठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं देवच साधून देईल या अभिवचनावर विश्वास ठेवा.
देव, जो क्षणोक्षणी आपल्या कृपेने काम करत असतो, भविष्यात आम्हांवर जी कृपा केलीं जाईल त्याविषयीच्या अभिवचनाचा अनुभव आपल्याला वर्तमान समयी चाखावयांस देतो. आपण आपलें तारण कसे साधून घ्यावे हे जेव्हा पौल आपल्याला स्पष्ट करून सांगतो तेव्हां पौलाचा जोर आम्हांवर भूतकाळात झालेंल्या कृपेविषयी आपण कृतज्ञ असावे यावर नाहीं. मी असे म्हणत आहे याचे शुद्ध कारण म्हणजें हे कीं अनेक ख्रिस्ती लोकांना जेव्हा विचारले जाते कीं आज्ञाधारकपणामागे हेतू काय असावा, तेव्हां आपण असे कृतज्ञतेमुळें करतो असे ते म्हणतील. परंतु पौल जेव्हा आमच्या कृती मागील हेतू आणि सामर्थ्य याबद्दल बोलतो तेव्हा तो यावर जोर देत नाहींये. देवानें जे अद्याप केलेंलें नाहीं ते तो साध्य करून देईल त्यावर विश्वास ठेवण्यावर तो जोर देत आहे, केवळ त्यानें जे केलें आहे त्यावर नाहीं. आपलें तारण साधून घ्या! का? आणि ते कसे? कारण देव प्रत्येक क्षणासाठीं नवी झालेंली कृपा पुरवितो. जेव्हां जेव्हां तुम्हीं इच्छा व कृती करता, तेव्हां तेव्हां ती इच्छा करणें व ती कृती करणें तुम्हांमध्यें तोच साध्य करून देत असतो. येणाऱ्या घटकेसाठीं आणि भावी काळांत येणाऱ्या हजारो वर्षांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीं ह्या सत्यावर विश्वास ठेवा.
भविष्यात जी कृपा केलीं जाईल तिचे सामर्थ्य जिवंत ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे –आपल्या प्रत्येक भावी क्षणी आपल्याठायीं ती कृती साधून द्यावयांस तो सदासर्वदा आम्हांबरोबर असतो. म्हणून जेव्हा पौल त्याच्यावर झालेंल्या देवाच्या कृपेच्या परिणामाचे वर्णन करतो तेव्हा तो म्हणतो, “ख्रिस्तानें माझ्या हातून न घडवलेले काहीं सांगण्याचे धाडस मी करणार नाहीं; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्यानें माझ्या शब्दांनी व कृतींनी, …. जे जे घडवले तेच मी सांगतो” (रोमकरांस 15:18).
यास्तव, ज्याअर्थी ख्रिस्तानें त्याच्या सेवाकार्याद्वारे जे काहीं साध्य केलें ते सोडून इतर काहींही बोलण्याचे त्यानें धाडस केलें नाहीं, आणि तरीही खरेतर ती कर्मे त्यानें केलीं, त्याअर्थी कृपने त्याच्या सेवेद्वारे जे जे साध्य केलें तो केवळ त्याबद्दल सांगतो (1 करिंथकरांस 15:10), म्हणजें याचा अर्थ असा कीं, कृपा जे सामर्थ्य साध्य करते ते ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे.
याचा अर्थ असा कीं पुढील पाच मिनिटांसाठीं आणि पुढील पाच दशकांच्या सेवेसाठीं आपल्याला ज्या सामर्थ्याची गरज आहे ते सामर्थ्य सर्वशक्तिमान ख्रिस्ताची भावी कृपा होय, जो युगानुयुग आम्हांबरोबर आहे – आपल्या सत्संकल्पासाठीं इच्छा करणें व कृती करणें हे साधून देण्यासाठीं सदैव तत्पर.