15  June : कधीही न संपणारा मधुचंद्र

Alethia4India
Alethia4India
15  June : कधीही न संपणारा मधुचंद्र
Loading
/

नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. (यशया 62:5)

जेव्हां देव त्याच्या लोकांचे कल्याण करतो, तेव्हां ते असें नसते कीं एखादा न्यायाधीश नाखुशीनें त्याला घृणा वाटणार्‍या गुन्हेगाराला नाईलाजानें दया दाखवत आहे. ते असें असते जसे नवरा मुलगा त्याच्या नवरीला आपुलकीं दाखवत असतो.

कधी कधी आपण चेष्टा करत विवाहा बाबत म्हणतो कीं, “मधुचंद्र आता संपला आहे.” याचे कारण आपल्यांला मर्यादा आहेत. आपण मधुचंद्राचा अग्नी आणि जिव्हाळा टिकवून ठेवू शकत नाहीं. पण देव म्हणतो कीं त्याचा त्याच्या लोकांकरिताचा आनंद एखाद्या नवऱ्यामुलाचा  त्याच्या नवरी वरील आनंदा प्रमाणें आहे. याचा अर्थ असा नाहीं कीं ते त्या प्रकारे सुरू होते आणि कालांतरानें त्याच्यात घट होत जाते.

तो मधुचंद्रात असलेंला अग्नी, सुख, जोम, उत्साह आणि आनंद या बद्दल बोलत आहे. तो आपल्यां मनाला हे सांगू पाहतो कीं जेव्हां देव आपल्यांसाठीं पूर्ण मनानें हर्ष करतो तेव्हां त्याचा अर्थ काय आहे. यिर्मया 32:41 – “मी त्यांच्याविषयीं आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावानें त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.” सफन्या 3:17 – “परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयीं आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयीं त्याला उल्लास वाटून तो गाईल.”

देवाचा मधुचंद्र कधीच संपत नाहीं. त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान आणि कल्पकता अनंत आहे, त्यामुळें पुढच्या अनंतकाळच्या अब्जावधी वर्षामध्यें देखील आपल्यांला कंटाळ येणार नाहीं.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *