तर आतां ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळें, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणांत अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. (इब्री 8:6)
इब्री 8:6 प्रमाणें ख्रिस्त हा नव्या कराराचा मध्यस्थ आहे. म्हणजें काय? म्हणजें हें कीं त्याच्या रक्तानें – जे या कराराचे रक्त आहे (लूक 22:20; इब्री 13:20) – आम्हांसाठीं देवाच्या अभिवचनांची पूर्तता ही अंतिमरीत्या आणि निर्णायकपणें विकत घेऊन ती राखून ठेवली आहेत.
याचा अर्थ असा आहे कीं देव, त्यानें नव्या कराराची जी अभिवचनें दिलीं त्याप्रमाणें, ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारें आम्हांमध्यें आंतरिक परिवर्तन घडवून आणतो.
आणि याचा अर्थ असा आहे कीं देव आपल्यामध्यें हे परिवर्तन विश्वासाद्वारें घडवून आणतो – म्हणजें ख्रिस्तामध्यें देव आपल्यासाठीं जो सर्वकांहीं झाला त्यावर विश्वास.
नवा करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारें विकत घेण्यांत आला आहे, ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारें तो कार्यकारी केला जातो आणि ख्रिस्तावरील विश्वासानें तो कह्यांत घेतला जातो.
ख्रिस्ताला नव्या कराराचा मध्यस्थ म्हणून कसे काम करतो याचे वर्णन इब्री 13:20-21 ह्या शात्र भागांत उत्तमरित्या केलेंलें आहे :
आता ज्या शांतीच्या देवानें ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’ तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्यें येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणें करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन
“तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्यें…करो” हे शब्द नवीन कराराच्या अनुषंगानें देव जेंव्हा आपल्या अंतःकरणावर त्याचे नियम लिहितो तेव्हां नेमके काय परिवर्तन घडून येते याचे वर्णन करतांत. आणि “येशू ख्रिस्ताच्या द्वारे” हे शब्द त्यां सार्वभौम कृपेनें घडून येणाऱ्या या गौरवशाली कामाचा मध्यस्थ म्हणून येशूचे वर्णन करतांत.
म्हणून, नाताळाचा अर्थ केवळ हा नाहीं कीं देव यां सर्व छायेचे ठिकाण खऱ्या स्वरूपाला देतो, तर त्याचा हाहि अर्थ होतो कीं तो ते खरे स्वरूप घेऊन त्याच्या लोकांसाठीं ते वास्तविक बनवतो. तो ते आमच्या हृदयपटलावर लिहितो. तो तारण आणि परिवर्तन यांनी भरून असलेलीं नाताळाची भेट झाडाखाली लपवून ठेवत नाहीं, कीं जणू ती आपण जाऊन आपल्या स्वत: च्या सामर्थ्यानें उचलावी. तर ती भेट तो स्वतः उचलतो आणि तुमच्या अंत:करणांत आणि तुमच्या मनात ठेवतो आणि तुम्हांला खात्री देतो कीं तुम्हीं देवाचे लेकरू आहात.