14 April : त्याच्या प्रसिद्धीसाठीं (गौरवासाठीं) प्रार्थना करा

Alethia4India
Alethia4India
14 April : त्याच्या प्रसिद्धीसाठीं (गौरवासाठीं) प्रार्थना करा
Loading
/

“ह्यास्तव तुम्हीं ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्यां स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (मत्तय 6:9).

पवित्र शास्त्र अनेकदा म्हणते कीं देव “त्याच्या नावासाठीं” कार्य करतो.

  • तो आपल्या नावासाठीं मला नीतिमार्गांनी चालवतो. (स्तोत्र  23:3)
  • हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर. (स्तोत्र  25:11)
  • त्यानें आपल्या नावासाठीं त्यांचे तारण केलें. (स्तोत्र 106:8)
  • माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला. (यशया 48:9)
  • कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झालीं आहे. (1 योहान  2:12)

जर तुम्हीं विचाराल कीं त्या सर्व वाक्यांत कोणती गोष्ट परमेश्वराचे अंतःकरण द्रवित करीत आहेत (आणि अनेकांस ते आवडतात), तर उत्तर हे आहे कीं देव यांत प्रसन्न होतो कीं त्याचे नाव कळविले जावे आणि त्याचा आदर केला जावा.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रार्थना जी करता येऊ शकते ती आहे, “तुझे नाव पवित्र मानले जावो.” मला असे वाटत होते कीं ही एक प्रशंसा आहे. जसे, “हालेलुया! प्रभूचे नाव पवित्र आहे!” पण ती प्रशंसा नाहीं. ती एक विनंती आहे. वास्तविक एक प्रकारचा आदेश किंवा आज्ञा. प्रभु, असेंच होऊं दे! ते पवित्र मानिले जाऊं दे. तुझे नाव पवित्र मानले जावो. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. मी यासाठीं तुला आग्रह करीत आहे: लोकांना तुझे नाव पवित्र मानावयास प्रवृत्त कर. मला तुझे नाव पवित्र मानावयास उत्तेजन दे!

जास्तीत जास्त लोकांनी त्याचे नाव “पवित्र” मानावे हे देवाला आवडते. म्हणूनच त्याचा पुत्र ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांस त्यासाठीं प्रार्थना करावयास शिकवतो. वस्तुतः, येशू हिला सर्वात पहिली आणि सर्वश्रेष्ठ प्रार्थना ठरवतो. कारण हा पित्याचा प्रथम आणि सर्वांत मोठा आवेश आहे.

“प्रभु, अधिकाधिक लोकांना तुझे नाव पवित्र मानण्याची प्रेरणा दे,” अर्थात, तुझ्या नावाचा आदर, प्रशंसा, मान, विचार, सन्मान, भक्ती, आणि स्तुती होऊ दे. अधिकाधिक लोकांनी ते करावें! म्हणून, आपण पाहू शकता कीं मुळांत ही एक सुवार्तिक प्रार्थना आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *