“परंतु तुम्हा ऐकणार्यांस मी सांगतो, तुम्हीं आपल्या वैर्यांवर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा.” (लूक 6:27)
ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या वैर्यांवर प्रीति करायची आहे आणि त्यांचे बरे करायचे आहे, ह्या मागे दोन मुख्य कारणे आहेत.
त्यातील एक कारण हे कीं, त्याद्वारें देव कोण आहे हे प्रकट होईल. देव हा दयाळू आहे.
- कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. (मत्तय 5:45)
- आमच्या पातकांच्या मानाने त्यानें आम्हांला शासन केलें नाहीं, त्यानें आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिलें नाहीं. (स्तोत्र 103:10)
- आणि तुम्हीं एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केलीं आहे तशी तुम्हींही एकमेकांना क्षमा करा. (इफिसकरांस पत्र 4:32)
म्हणून, जेव्हां ख्रिस्ती लोक देवाच्या सामर्थ्याद्वारें अशा प्रकारे जीवन जगतात, तेव्हां आपण देव कसा आहे हे दाखवून देतो.
दुसरे कारण हे आहे कीं, ख्रिस्ती लोकांचे मन देवा मध्यें संतुष्ट असते आणि ते सूड उगवणे, तसेंच स्वतःचे गौरव करून घेणें किंवा संपत्ति किंवा जगिक सुरक्षिततेच्या लालसेने चालत नाहीं.
देव आपली संपूर्ण संतुष्टी करणारा ठेवा बनलेला असतो त्यामुळें आपण आपल्या वैर्यांना आपल्या गरजे प्रमाणे आणि आपल्या असुरक्षिततेने वागवत नाहीं, तर आपण आपल्या देवाच्या संतुष्टी करण्यार्या गौरवाच्या परिपूर्णतेने वागवतो.
इब्री 10:34, “कारण बंदिवानांबरोबर तुम्हीं समदुःखी झालात आणि [स्वर्गात] आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्हीं आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. [ म्हणजेंच तुम्हीं तुमच्यां वैर्यांवर सूड घेतला नाहीं ].” हे जग आपले घर नाहीं आहे आणि देवच आपले संपूर्ण संतुष्टी करणारे पारितोषिक आहे, ह्या गोष्टीमधील भरवसा सूड घेण्याच्या दाट सक्तीच्या भावनेला काढून टाकतो. आपल्याला हे ठाऊक आहे कीं, “अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे.”
मग, वैर्यांवर प्रीति करण्याच्या ह्या दोन्ही कारणांमध्यें मुख्य गोष्ट ही पाहतो कीं, देव जसा आहे तसाच दयाळू आणि गौरवीरित्या सर्व संतुष्टी करणारा दाखवला आहे.
आपले दयाळू असण्याचे सामर्थ्य हे आहे कीं आपण आपल्यावर झालेंल्या देवाच्या दयेने तृप्ती पावलो आहोत. आणि दयाळू असण्याचे सर्वोच्च कारण, देवाला गौरव देणे हे आहे, म्हणजेंच, त्याच्या दये करिता त्याला उंच करण्यास इतरांची मदत करणे होय. आपल्याला हे दाखवायचे आहे कीं, देव हा उत्कृष्ट आहे. आपल्याला देवाच्या दयेने, आपल्या प्रीति द्वारें देव महान आहे हे इतरांना दाखवायचे आहे.