अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत (रोमकरांस 11:33)
अब्राहम लिंकन, ज्यांचा जन्म 1809 साली आजच्याच दिवशी झाला होता, तें त्यांच्या चाळीशीत धर्माबाबत संशयी व तर कधी कधी धर्माचा उपहास करणारे असें देखील होते. पण कश्याप्रकारे ते वैयक्तिकरित्या स्वतःवर व देशावर आलेले संकट यामुळें देवापासुन दूर जाण्याऐवजी देवा जवळ आले हे पाहणे लक्षवेधी आहे.
1862 साली जेव्हां लिंकन 53 वर्षाचे होते तेव्हां त्यांचा मुलगा विली याचे निधन झालें, त्या “दु:खातून बाहेर पडण्यासाठीं त्यांची पत्नी न्यू एज या गूढवादी शिक्षणाकडे वळाली”, तर लिंकन हे न्यूयॉर्क एव्हेन्यू, प्रेस्ब्यटेरियन चर्च वॉशिंग्टन येथील पाळक फिनेयास गर्ली यांचा शिक्षणाकडे वळाले.
आणि जसा कीं श्रीमान गरले उल्लेख करतांत, अनेक वैयक्तिक चर्चां नंतर लिंकन यांचा “ख्रिस्तामध्यें नवा जन्म झाला.” लिंकन यांनी अनेक वेळा उघड केलें कीं, “ख्रिस्ताला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही, या भावनेने मी अनेक वेळा माझ्या गुडघ्यांवर येऊन प्रार्थना केलीं.”
त्याच बरोबर, जखमी व मरण पावलेले सैनिक यांची यातना त्यांना रोज व्यथित करीत असें. वॉशिंग्टन येथें जखमी सैनिकांसाठीं पन्नास दवाखाने होते व कॅपीटॉलच्या इमारतीमध्ये जखमींसाठीं दोन हजार बेड उपलब्ध केले गेले होते.
या तात्पुरत्या स्वरुपाच्या दवाखान्यामध्ये रोज पन्नास सैनिकांचा मृत्यू होत असे. या सर्व गोष्टींमुळे लिंकन देवाच्या कृपेच्या अधिक जवळ येत गेलें. “ज्याने हे जग निर्माण केले, त्यावर आज देखील त्याचीच सत्ता आहे, यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपण कांहीच करूं शकत नाहीं.
त्यांचा हत्येच्या एक महिना अगोदर, आपल्या दुसर्या कार्यकालाच्या भाषणाच्या वेळी त्यांनी गृहयुद्ध व देवाची कृपायोजना यांतील परस्पर संबंधावर आपलं सर्वात प्रसिद्ध वक्तव्य केलं. देव हा संयुक्त किंवा संघ राज्याच्या बाजूने नाही हे त्यांचे उदद्गार खूप उल्लेखणीय आहेत . देवाच्या स्वताच्या योजना असतात व तो दोन्ही बाजू कडील पापासाठीं कुठलीहि सबब (काही केले तरी अद्दल घडणार नाही अशी स्थिती) मानत नाही.
आम्हीं एकनिष्ठेने आशा करतो – आम्हीं तत्परतेने प्रार्थना करतो –कीं हे युद्धाचे मोठे अरिष्ट लवकरच संपुष्टात यावें.
तरी सुद्धा, देवाची इच्छा असेल कीं ते सुरू रहावे, दासांनी दोनशे वर्ष कष्ट करून मिळवलेल्या संपतीचा पूर्ण -हास झाला तरी, जो पर्येंत चाबकाच्या फट्कयांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची परतफेड तलवारीने होत नाही तो पर्येंत जरी युद्धं सुरू राहिले तरी देखील, आणि तीन हजार वर्षापूर्वी जसें नमूद केले होते, तें आजहि ओरड करून सांगितले गेलें पाहिजें कीं, “देवाचे सर्व न्याय योग्य व नीतिमान आहेत, हेच सत्य आहे.”
मी तुम्हां सर्वांकरिता, ज्यांनी काही तरी गमावले आहे, जे अतोनात दु:खात आहेत व जे वेदनेत आहेत, अशी प्रार्थना करितो, कीं जशी लिंकन यांना आली तशी तुम्हाला देखील या गोष्टीची प्रचिती यावी, कीं आपण हताश होऊन सर्व दोष नियतीवर न देता, देवाचे अगाध ज्ञान व त्याच्या कृपा-योजनांवर आपण गाढ भरवंसा ठेवावा.