सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, स्वर्गामध्यें राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडें बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्रस्थानाचा म्हणजें माणसानें नव्हे तर ‘प्रभूनें घातलेल्या’ खर्या ‘मंडपाचा’ सेवक आहे. (इब्री 8:1-2)
इब्रीलोकांस पत्राच्या पुस्तकाचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, देवाचा पुत्र असलेला येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ आणि अंतिम मानव-याजक म्हणून देवानें लावून दिलेंल्यां याजकीय सेवेची केवळ या पृथ्वीवरील व्यवस्थेमध्यें सांगड बसण्यासाठीं आला नाहीं, तर तो त्या व्यवस्थेची अंतिम पूर्तता करण्यासाठीं आणि तिचा अंत करण्यासाठीं, आणि आमचे सर्व लक्ष स्वतःवर केंद्रित करवून घेण्यासाठीं आला आहे, जो सर्वप्रथम कॅल्व्हरी येथे आमचे अंतिम अर्पण बनला आणि आता स्वर्गात आमचा अंतिम याजक म्हणून सेवा करित आहे.
जुन्या कराराचा मंडप आणि याजक आणि यज्ञ ह्या सर्व गोष्टीं केवळ छाया होत्या. आता जे वास्तविक ते आलें आहे आणि छाया लयांस गेल्या आहेत.
येथे लहान लेकरांसाठीं नाताळाच्या आगमनाविषयी एक गोष्ट आहे — आणि आपण जे एकेकाळी लहान मुलें होतो त्यां आपल्याला त्याची आठवण असेलच कीं या गोष्टींत नेमके काय व्हायचे. तुम्हीं नाताळाच्या खरेदीसाठीं तुमच्या आईबरोबर बाजारात जातां आणि समजां तुम्हीं सुपर-शॉप किराणा दुकानात हरवलांत आणि तुमची आई तुम्हांला दिसत नाहीं, आणि तुम्हांला भीती वाटू लागते आणि तुम्हीं घाबरून जाता आणि किराणावस्तु ठेवलेल्या कोणत्या लेन मधून जायचे ते कळत नाहीं, आणि तुम्हीं लेनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत राहतां आणि तुम्हीं रडायला सुरवात करणाच तेवढ्यांत लगेच लेनच्या एका टोकाला तुम्हांला जमिनीवर एक सावली (छाया) दिसू लागते जिचा आकार अगदी तुमच्या आईसारखी आहे. आतां, ह्यामुळें खरोखर तुमच्या जीवांत जीव येतो आणि आई येथेंच असल्याची एक आशा निर्माण होते. पण कोणती गोष्ट उत्तम आहे? आईची छाया दिसून आली ही आशा, कीं आईनें कोपऱ्यात पाऊल टाकलें आणि हे कीं ते पाऊल खरोखर तिचे आहे?
जेंव्हा येशू आपला महायाजक म्हणून प्रकट झाला तेव्हां नेमके हेच झालें. नाताळाचा अर्थ म्हणजें हांच. नाताळ म्हणजें छायेच्या ऐवजी खरी आणि ठोंस अशी गोष्ट : आई किराणावस्तु ठेवलेल्या लेनच्या एका कोपऱ्यात पाऊल टाकते आणि त्यामुळें जे सुखावलेले समाधान व जो आनंद त्यां लहान मुलाला प्राप्त होतो ते.