
जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्यें अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो कीं विश्वासपूर्वक ऐकण्याकडून? (गलती 3:5)
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्यें पवित्र आत्मा वस्ती करून राहतो. प्रेषित पौल म्हणतो, “जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेंला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाहीं” (रोम 8:9). आत्मा तुमच्याकडें पहिल्यांदा तेव्हा आला जेव्हा तुम्हीं रक्ताने विकत घेतलेल्या परमेश्वराच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला. आणि आत्मा याच माध्यमाद्वारे येत राहतो आणि कार्य करत राहतो.
म्हणून पौल गलती 3:5 मध्यें अलंकारिक शब्दांत असे विचारतो, “जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्यें अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो कीं विश्वासपूर्वक ऐकण्याकडून?“ उत्तर आहे: “विश्वासपूर्वक ऐकण्याकडून.”
तर अशाप्रकारे, आत्मा पहिल्यांदा आला, आणि विश्वासपूर्वक ऐकण्याकडून आत्म्याचा पुरवठा होत राहतो. जे काहीं तो आमच्यामध्यें आणि आमच्याद्वारे साध्य करतो ते सर्व तो विश्वासाद्वारे करतो.
जर तुम्हीं माझ्यासारखे असाल, तर तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याने सामर्थ्याने कार्य करावें अशी प्रबळ उत्कंठा तुम्हांला वेळोवेळी होत असेलच. कदाचित तुम्हीं तुमच्या जीवनात अथवा तुमच्या कुटुंबात किंवा मंडळीत किंवा शहरात देवाच्या आत्म्याच्या वर्षावासाठीं त्याचा धावा करत असाल. अशाप्रकारचा धावा अथवा आक्रोश योग्य आणि चांगला आहे. येशूनें म्हटले, “तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतांत त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक 11:13).
पण देवाच्या विशिष्ट अभिवचनांवर विश्वास करण्याद्वारे विपुलतेने आत्म्याच्या कार्यासाठीं स्वतःस तयार करण्यात मी विफल आहे हे मला माझ्या स्वतःच्या जीवनात बरेचदा आढळून आलें आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ केवळ हे अभिवचन नाहीं कीं आम्हीं मागितल्यावर आत्मा येईल. माझ्या बोलण्याचा अर्थ त्यां सर्व इतर मौल्यवान अभिवचनांकडें संकेत करणें आहे जी प्रत्यक्ष आत्म्याबद्दल नाहींत, पण कदाचित माझ्या भविष्यासाठीं देवाच्या तरतूदीविषयी आहेत – उदाहरणार्थ, “माझा देव तुमची सर्व गरज पुरवील” (फिलिप्पै 4:19). विशिष्ट परिस्थितींसाठीं विशिष्ट अभिवचनांवरील विश्वासाच्या विशिष्ट कृतींद्वारे देवाचा आत्मा सतत आणि सामर्थ्यवान मार्गाने पुरविला जातो. त्यानें जे करण्याचे अभिवचन दिलें आहे ते करण्यासाठीं मी आत्ताच ह्या क्षणी त्याच्यावर विश्वास ठेवतो का?
कित्येक ख्रिस्ती लोकांच्या जीवनात आत्म्याच्या सामर्थ्याचा शोध घेत असतांना त्यांच्या अनुभवांत उणीव याच गोष्टीची असते. “विश्वासपूर्वक ऐकण्याकडून” (गलती 3:5) आत्मा आम्हांला पुरवला जातो – स्वतः आत्माविषयीच्या फक्त एक दोन अभिवचनांवरील विश्वासाद्वारे नाहीं, तर आम्हास ज्या गोष्टीची गरज आहे ती करण्यासाठीं, आणि ती आमच्यासाठीं घडून यावी म्हणून आमच्या भविष्यातील देवाच्या आत्म्याचे समाधान देणारे देवाचे सान्निध्य या सर्व अभिवचनांवरील विश्वासाद्वारे.