11 जानेवारी: देवासाठीं व सत्यासाठीं आवेशी

Alethia4India
Alethia4India
11 जानेवारी: देवासाठीं व सत्यासाठीं आवेशी
Loading
/

कित्येकांनी विश्वास ठेवला नाहीं म्हणून काय झालें? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधींच नाहीं! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रांतहि लिहिलेलें आहे कीं, “तूं आपल्या वचनांत नीतिमान ठरावें, आणि तुझा न्याय होत असतां तुला जय मिळावा.” (रोमकरांस 3:3-4)

सत्याविषयीं आमचा आवेश देवाविषयींच्या आमच्या अवेशाविषयीचें स्वाभाविक प्रकटीकरण आहे. जर देव आहे, तर मग तोंच सर्व गोष्टींची परिभाषा करतो आणि सर्व गोष्टींविषयीं तो जो विचार करतो त्यांद्वारेंच आपलें विचार काय असावेंत हे ठरविलें जातें.

सत्याला न जुमानणें म्हणजेच देवाला न जुमानणें. देवावर प्रेम करण्याविषयीं आवेशी असणें म्हणजेंच सत्यावर प्रेम करण्याविषयीं आवेशी असणें होय. आपलें जीवन देव-केंद्रित असणें म्हणजेंच सेवाकार्यांत सत्य-चालित असणें होय. जें सत्य नाहीं तें देवापांसून नाहीं.

देव आणि सत्य यांबाबतींत पुढील चार शास्त्रलेखांवर चिंतन करा:

1) देव सत्य आहे

रोमकरांस 3:3-4 (देव जो पिता): “कित्येकांनी विश्वास ठेवला नाहीं म्हणून काय झालें? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधींच नाहीं! देव खरा  आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो.”

योहान 14:6 (देव जो पुत्र): येशूनें त्याला म्हटलें, “मार्ग, सत्य  व जीवन मींच आहे; माझ्या द्वारें आल्यावांचून पित्याकडे कोणी येत नाहीं.”

योहान 15:26 (देव जो आत्मा): परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मीं पित्यापासून तुम्हांकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हां तो माझ्याविषयीं साक्ष देईल.

2) सत्यावर प्रेम न करण्याचा परिणाम सार्वकालिक नाश आहे

दुसरें थेस्सलनीकाकरांस 2:10: ज्यांचा नाश होत चालला आहें त्यांनी आपलें तारण साधावें म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाहीं.

3) सत्याचें ज्ञान ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे

1 करिंथकरांस 6:15-16: “तुमचीं शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हें तुम्हांला ठाऊक नाहीं काय? तर मग मीं ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावेत काय? कधींच नाहीं! जो कसबिणीशीं जडला तो व ती एकशरीर आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?

4) ख्रिस्ताच्या शरीराचीं बांधणी सत्यावर प्रेमानें केलेलींहें

कलस्सैकरांस 1:28: “आम्हीं त्याची घोषणा करितों, सर्व प्रकारच्या ज्ञानानें प्रत्येक माणसाला बोध करितों व प्रत्येक माणसाला शिकवितों; अशासाठीं कीं, प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायीं पूर्ण असें उभें करावें.”

देव आपल्याला त्याच्यासाठीं आणि सत्यासाठीं आवेशानें भरून काढो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *