कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झालें, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झालें तो ख्रिस्ताचा दास आहे. (1 करिंथकरांस 7:22)
पौलानें “प्रभू” चा पर्यायी शब्द “धनी” आणि “ख्रिस्त” चा पर्यायी शब्द मशीहा उपयोगात आणला असतां तर माझ्यामते ते अधिक बरें झालें असतें.
पौल आम्हांला गुलामगिरीतून मोकळे केलें जाण्याच्या कृतीचा परस्पर संबंध येशू बरोंबर ह्या अर्थानें जोडतो कीं तो आमचा धनी आहे (“गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य”). आणि तो आपल्या नव्या दासत्वाचा (“ख्रिस्ताचा दास”) परस्पर संबंध येशू बरोंबर ह्या अर्थानें जोडतो कीं तो आमचा मशीहा आहे. ही गोष्ट जरा विलक्षण वाटते कारण मशीहा जेव्हां आला तो ते आपल्या लोकांना त्यांना कैद करणाऱ्यांपासून सोडविण्यांस आला होता; आणि धनी आपल्या दासांवर प्रभूत्व करतांत.
तो असे का म्हणतो? तो मशीहाचा संबंध (मुक्तीऐवजी) गुलामगिरीला आणि मुक्तीचा संबंध (गुलामीऐवजी) धन्याला का जोडतो?
प्रस्ताव : या पर्यायाचे आपल्या नव्या स्वातंत्र्यावर दोन परिणाम, आणि आपल्या नव्या दासत्वावर दोन परिणाम झालें आहेत.
एकीकडे, जेव्हां तो आम्हांला “गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य” असें म्हणतो, तेव्हां तो आपल्या नव्या स्वातंत्र्याची खात्री देतो त्यांच वेळीं तिला मर्यादितहि करतो :
1. त्याचे प्रभुत्व इतर सर्व प्रभूंवर आहे (म्हणजे तो प्रभूंचा प्रभू आहे); त्यामुळे आम्हांला मोकळे केलें जाणें हें निर्विवाद आहे — म्हणजे पूर्णपणे सुरक्षित.
2. परंतु, जरी आपण इतर सर्व प्रभूंपासून स्वतंत्र केलें गेलों असलों, तरी आपण त्याच्यापासून स्वतंत्र नाही. आपले स्वातंत्र्य कृपेनें मर्यादित आहे. येशू आपला धनी आहे.
तर दुसरीकडे, जेव्हां तो आम्हांला “ख्रिस्ताचा दास” म्हणतो, तेव्हां तो आपल्या ह्या नव्या गुलामगिरीला विसावा देणारी व गोड असें नवे स्वरूप देतो :
1. मशीहा आपल्या लोकांना त्यांना बंदिस्त करणाऱ्याच्या बंधनांतून सोडवून विसाव्याच्या मोकळ्या ठिकाणी आणण्यासाठीं त्यांना आपल्या ताब्यात घेतो. “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार” (यशया 9:7).
2. मग तो त्यांना अत्यंत गोड असा आनंद देण्यासाठीं त्यांना स्वतःचे लोक बनवतो. “पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन” (स्तोत्र 81:16). आणि तो खडक तर ख्रिस्त, म्हणजे मशीहा आहे.
म्हणून, प्रिय ख्रिस्ती बंधुजनहो, यांत आनंद करा: “ज्याला प्रभूमध्ये पाचारण झालें, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे” – धनी. “तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झालें तो ख्रिस्ताचा दास आहे” –मशीहा जो दासत्वाला विसावा देणारी व गोड अशी गोष्ट बनवितो.