11 December : येशू का आला

Alethia4India
Alethia4India
11 December : येशू का आला
Loading
/

ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे, आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्रीलोकांस 2:14-15)

मला असं वाटतं, कीं हा शास्त्रपाठ नाताळाच्या आगमनाविषयी माझा आवडता शास्त्रपाठ आहे कारण असा दुसरा कोणताही शास्त्रपाठ मला माहीत नाहीं जो येशूच्या पृथ्वीवरील जीवनाचा आरंभ आणि शेवट – म्हणजें त्याचे देहधारण आणि वधस्तंभावरील मरण- यांच्यातील संबंध स्पष्टपणें व्यक्त करत असेल. ही दोन वचनें येशूच्या येण्यामागचा हेतू अगदी स्पष्ट करतांत; म्हणजें, त्यानें मरण सोसावे यासाठीं. नाताळाविषयीं तुमचा ख्रिस्ती दृष्टिकोन काय आहे हे तुम्हीं तुमच्या एखाद्या ख्रिस्तीतर मित्राला किंवा अजूनही तारण न पावलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला टप्प्याटप्प्यानें समजावून सांगण्यासाठी ह्या वचनांचा उपयोग करणें उत्तम ठरेल. तुम्हीं  टप्प्याटप्प्यानें समजावून सांगण्यासाठी एका वेळी एक वाक्यखंड घेऊन खालील पद्धतीचा उपयोग करूं शकतां :   

“ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती. . . “

“मुलें” हा शब्द मागील वचनातून प्रयुक्त केला गेला आहे आणि तो शब्द मशीहा म्हटलेंल्या ख्रिस्ताच्या आध्यात्मिक मुलांकडें संकेत करतो (यशया 8:18; 53:10 पहा). ही “देवाची मुलें” देखील आहेत (योहान 1:12). दुसऱ्या शब्दांत, देवानें ख्रिस्ताला पाठवलें ते विशेषत: आपल्या “मुलांचे” तारण व्हावें म्हणून.

हे खरे आहे कीं “देवानें जगावर अशी प्रीति केलीं कीं त्यानें आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिला” (योहान 3:16). परंतु हे देखील खरे आहे कीं देव विशेषतः “देवाच्या पांगलेल्या मुलांनाहीं जमवून एकत्र” करित होता (योहान 11:52).आपण ख्रिस्ताला जगासाठीं अर्पण करावें आणि आपल्या “मुलांचे” तारण साध्य करून घेणें हा त्यामागे देवाचा हेतू होता (पहा 1 तीमथ्य 4:10). तुम्हीं ख्रिस्तावर विश्वास ठेऊन देवाची दत्तक-मुलें बनूं शकता (योहान 1:12).

” . . त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. . “

याचा अर्थ असा कीं ख्रिस्त देही झाला त्यापूर्वीहि तो होता. तो आत्मा होता. तो सनातन शब्द होता. तो देवासह होता आणि देव होता (योहान 1:1; कलस्सैकर 2:9). पण तो रक्तमांसाचा झाला आणि आपल्या देवपणावर मानवस्वरूपाचे आच्छादन घातलें. तो पूर्ण मनुष्य बनला आणि त्याचवेळी पूर्णतः देवहि होता. हे वेगवेगळ्या कारणांनी महान गुड आहे. ते आपल्या विश्वासाचे— आणि बायबल जे जे शिक्षण देते त्याचे –मूळ आहे.

” . . मरणानें. . . “

तो मानव बनला, हेतू हा कीं आपण मरावे. देव शुद्ध आणि अखंड असल्यानें तो पापी लोकांसाठीं मरू शकत नाहीं. पण माणूस म्हणून तो ते मरण पत्करू शकला. मरण हेच त्याचे ध्येय होते. त्यामुळें त्याला मानव म्हणून जन्म घ्यावा लागला. तो मरण्यासाठीं जन्माला आला होता. गुड फ्रायडे हा नाताळाचा उद्देश होय. नाताळ म्हणजें काय आज बहुतेक लोकांना हेच ऐकण्याची गरज आहे.

” . . कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे. . . “

आपल्यां मरणाने, ख्रिस्तानें सैतानाला शून्यवत केलें, म्हणजें त्याचे विषारी दांत पाडलें. कसे? आमची सर्व पापें झाकून. याचा अर्थ असा कीं सैतानाकडें देवासमोर आपल्यावर आरोप लावण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाहीं. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे” (रोमकरांस 8:33) — तो कोणत्या आधारावर नीतिमान ठरवतो? येशूच्या रक्तानें (रोमकरांस 5:9).

सैतानाचे अंतिम शस्त्र जे तो आपल्याविरुद्ध उपयोगांत आणतो ते आपलें स्वतःचे पाप आहे. जर येशूच्या मृत्यूनें ते काढून घेतलें तर, सैतानाचे मुख्य शस्त्र – त्याच्याकडें असलेलें एक नश्वर शस्त्र – त्याच्या हातातून काढून घेतलें जाते. आम्हांला मरण-दंड व्हावा असा अभियोग तो आता आमच्या विरुद्ध आणू शकत नाहीं, कारण नीतिमान ठरविणारा जो न्यायाधीश त्यानें आपल्या पुत्राच्या मरणाने  आमची निर्दोष मुक्तता केलीं आहे!

” . . आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.”

म्हणून आता आपण मरणाच्या भयापासून मुक्त आहों. देवानें आपल्याला नीतिमान ठरवलें आहे. सैतान देवाचा हा राजादेश मोडू शकत नाहीं. आणि देवाचा हेतू असा आहे कीं आपला हा राजादेश आपल्या अंतिम सुरक्षेतेसाठीं आपल्या जीवनात त्वरित अमलांत यावा. त्याचा ह्यामागील हेतू हा कीं शेवट हा हर्षनादाने व्हावा म्हणून संप्रतकाळात असलेल्या दास्याचे बंधन आणि भय हे आमच्यातून काढून टाकावें.

जर आपल्याला आपला शेवटचा आणि सर्वात मोठा शत्रू, म्हणजें मृत्यूची भीती बाळगण्याची गरज नाहीं, तर आपल्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाहीं. आपण मुक्त होऊ शकतो. हर्षनाद करण्यासाठीं मुक्त. आणि हा हर्ष इतरांसाठीं देखील फुकट आहे.

देवाकडून आम्हांला मिळालेली नाताळाची ही किती अप्रतिम भेट आहे! आणि आम्हांकडून जगाला!

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *