ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्या देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे; ह्यासाठीं कीं, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायीं व तुम्हांला त्याच्या ठायीं गौरव मिळावा. (2 थेस्सलनीका 1:11-12)
कृपा ही देवाची केवळ अशी प्रवृत्ती नाहीं कीं आपण पात्र नसतांनाहि तो आपलें कल्याण करतो – आपण तिला “आमच्या प्रतिकूलतेंत पात्र नसतांनाहि आम्हांसाठीं देवाची अनुकूलता” असे म्हणतो; तर देवाची कृपा ही देवाकडून येणारे सामर्थ्य देखील आहे जे आपल्या जीवनात कार्य करते आणि आपल्यामध्यें आणि आपल्यासाठीं चांगल्या गोष्टी घडवते – आणि ह्या कृपेस देखील आपण पात्र नसतो.
पौलाने म्हटले कीं आपल्यात चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय हा देवाच्या “सामर्थ्याने” पूर्ण होतो (वचन 11). आणि मग तो वचन 12 च्या शेवटी असे म्हणतो, “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने.” हे सामर्थ्य जे आमच्यांत ख्रिस्ताला उंचविणारी आज्ञाधारकता निर्माण करण्यासाठीं आमच्या जीवनात प्रत्यक्षात कार्य करते, देवाच्या कृपेने घडून येणारे परिश्रम आहे.
आपण हे 1 करिंथ 15:10 मध्यें देखील पाहू शकता:
तरी जो काहीं मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेने केलें.
तर मग, कृपा ही एक सक्रिय, सदैव उपस्थित, जीवन बदलून टाकणारी, आज्ञाधारक शक्ती आहे.
म्हणून, ही कृपा, जी वेळोवेळी देवाकडून तुमच्याकडें सामर्थ्याने वाहत येते, ती गतकालीन व भावी अशी दोन्ही स्वरुपाची आहे. ज्याअर्थी तिच्याद्वारे आपल्यासाठीं किंवा आपल्या अंतकरणात पूर्वी काहींतरी घडवून आणिले गेलें, म्हणून ती गतकालीन कृपा म्हटली जाते. आणि ज्याअर्थी आता त्यांच कृपेद्वारे आपल्यासाठीं किंवा आपल्या अंतकरणात वर्तमान समयी काहींतरी घडवून आणिले जात आहे म्हणून, तिला भावी कृपा म्हटले जाते – आतापासून पुढे पाच सेकंद आणि आतापासून पुढे पाच दशलक्ष वर्षे, दोनहि.
देवाची कृपा ही कृपेच्या अक्षय झऱ्यातून वाहणाऱ्या वर्तमानाच्या धबधब्यावरून सतत झिरपत असते जी आमच्यावर भूतकाळात झालेंल्या कृपेच्या सतत वाढत जाणाऱ्या जलाशयातून भविष्याकडून आमच्याकडें वाहत येत आहे. पुढच्या पाच मिनिटांत, तुम्हांला भविष्याकडून येणारी सांभाळ करणारी कृपा प्राप्त होईल — तुमचा यावर विश्वास आहे; तसेच भूतकाळात झालेंल्या कृपेच्या जलाशयाकडून आणखी पाच मिनिटांची कृपा तुमच्या खाती जमा होईल – यासाठीं तुम्हीं देवाचे आभार मानता.