
“कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाहीं, असा आपला प्रमुख याजक नाहीं, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.” (इब्री 4:15).
मी कोणालाही कधीही असे म्हणतांना ऐकलेले नाहीं, ”माझ्या जीवनाचे खरोखर गंभीर धडे सुख आणि विश्रांतीच्या समयातून आले आहेत.“ तर मी सुदृढ पवित्र जणांस असे म्हणतांना ऐकले आहे, ”देवाच्या प्रीतिच्या खोलीचे आकलन करून घेण्यासाठीं आणि त्याजबरोबर खोलवर वाढत जाण्यासाठीं मी केलेंली प्रत्येक महत्त्वाची वाटचाल दुःखातून आली आहे.”
हे एक गंभीर बायबलसंबंधीत सत्य आहे. उदाहरणार्थ:”इतकेच नाहीं, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीं कीं, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पै 3:8). अर्थ: वेदना नाहीं, तर लाभ नाहीं.
किंवा: आता मला जर त्याद्वारे ख्रिस्ताचा अधिक लाभ होत असेल, तर मग सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे.
येथे आणखी एक उदाहरण आहे: अर्थ: ”तो पुत्र असूनही त्यानें जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;” (इब्री 5:8). याच पुस्तकात असे म्हटलेंले आहे कीं त्यानें कधी पाप केलें नाहीं (इब्री 4:15).
म्हणून आज्ञाधारकपणा शिकण्याचा अर्थ हा नाहीं कीं अवज्ञेकडून आज्ञाधारकपणाकडें येतो. याचा अर्थ आज्ञाधारकपणाच्या अनुभवात देवासोबत अधिक खोलवर वाढत जाणे. याचा अर्थ देवाप्रत समर्पणाचा अनुभव करणे जो अन्यथा प्राप्त झाला नसता. दुःखातून हेच प्राप्त होते. वेदना नाहीं, तर लाभ नाहीं.
सॅम्युएल रदरफोर्डने म्हटलें कीं जेव्हां त्यांना दुःखाच्या कालकोठीत टाकण्यात आले तेव्हां त्यांना आठवले कीं थोर राजा नेहमी तेथे त्याचा द्राक्षरस ठेवत असे. चार्ल्स स्पर्जन यांनी म्हटलें, “दुःखाच्या समुद्रात डुबकीं मारणारे दुर्लभ मोती आणतात.”
जेव्हां तुम्हांला काहीं अनोख्या वेदना होतात ज्यामुळे तुम्हांला असे वाटते कीं कर्करोग झाला आहे तेव्हां तुम्हीं तुमच्या प्रिय व्यक्तीवर अधिक प्रीति करीत नाहीं का? आम्हीं खरोखर विचित्र प्राणी आहोत. जर आपल्याजवळ आरोग्य आणि शांती आणि प्रेम करण्यास वेळ असेल तर ती एक पातळ आणि घाईघाईची गोष्ट ठरू शकते. परंतु जर आपण मरणाच्या लागास असू, तर प्रेम ही एक अव्यक्त आनंदाची खोल, संथ नदी बनते, आणि आपण क्वचितच तिचा त्याग करणे सहन करू शकतो.
म्हणून, माझ्या बंधूं आणि भगिनींनो, “नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हां तुम्हीं आनंदच माना.” (याकोब 1:2).