10 July : अभिमानास्पद कर्म विरुद्ध विनम्र विश्वास

Alethia4India
Alethia4India
10 July : अभिमानास्पद कर्म विरुद्ध विनम्र विश्वास
Loading
/

त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्हीं तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केलीं नाहींत काय?’ (मत्तय 7:22)

“विश्वासा” मागची मानसिकता आणि “कर्माच्या” मागची मानसिकता यातील फरक विचारात घ्या.

स्वतःच्या बळावर एखादी गोष्ट साध्य केलीं या गर्वाच्या भावनेने कर्माच्या मानसिकतेंचे समाधान प्राप्त होते. तो उभ्या खडकावर चढण्याचा प्रयत्न करेल, किंवा कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या हाती घेईल, किंवा युद्ध क्षेत्रात जीव धोक्यात घालेल, किंवा मॅरेथॉनमध्यें वेदना सहन करील, किंवा कित्येक आठवडे धार्मिक प्रवृत्तीने उपवास करेल – सर्व काहीं स्वतःच्या इच्छेच्या बळाने आणि स्वतःच्या शरीराच्या जोमाने समोर असलेले आव्हान जिंकण्याच्या समाधानासाठीं.

कर्म-केंद्रित मानसिकता विकोपाला जाऊ शकते आणि दुसऱ्याला श्रेय देणें, आत्म्याचा दीनपणा व नैतिकता याविरुद्ध बंड करून स्वतःच्या स्वातंत्र्याविषयीची आणि ‘मीच माझा मार्गदर्शक’ याविषयी आणि स्वतःच्या कामगिरीविषयी आपली प्रीति व्यक्त करू शकते (गलती 5:19-21). पण ही तीच स्व-निर्धारित, आत्मगौरवी कर्म-केंद्रित मानसिकता आहे – मग ते अनैतिक होणें असो किंवा अनैतिक वागणुकींविरुद्ध धर्मयुद्ध करणें असो. यांत सर्वसामान्य कारक म्हणजें स्वदिशानिर्देशन, आत्मनिर्भरता आणि आत्म-गौरव. या सर्वांमध्यें, कर्म-केंद्रित मानसिकतेचे मूलभूत समाधान म्हणजें एक खंबीर, स्वायत्त आणि शक्य असल्यास, विजयी आत्मनिर्भरतेचा आस्वाद.

विश्वासाची मानसिकता पूर्णपणें वेगळीच असते. जेव्हा तो भविष्याकडें पाहतो त्यावेळी त्याची इच्छा बळकट असते. परंतु ज्या गोष्टीची तो इच्छा करतो ती म्हणजें येशूमध्यें परमेश्वर आपल्यासाठीं जे काहीं आहे त्या सर्व गोष्टींना अनुभवाने जाणून घेण्यांत पूर्ण समाधान प्राप्त करण्याची.

जर “कर्म” स्वतःला अडखळणावर विजय मिळविल्याचे समाधान प्राप्त करू पाहते, तर “विश्वास” देवानें अडखळणावर विजय मिळविला या समाधानाचा आस्वाद घेतो. कर्म सक्षम, बलवान आणि चतूर म्हणून गौरवान्वित झाल्याच्या आनंदाची इच्छा धरतो. विश्वास देवाला त्याचे कर्तुत्व आणि बळ आणि बुद्धी आणि कृपेसाठीं गौरवान्वित होतांना पाहण्याची उत्कंठा करतो.

आपल्या धार्मिक स्वरूपात, कर्मे नैतिकतेचे आव्हान स्वीकारतांत, त्याच्या अडखळणांवर मोठ्या कष्टाने विजय मिळवतांत आणि त्याची मान्यता व प्रतिफळ म्हणून देवाकडें आपण विजयी झाल्याचा प्रस्ताव सादर करतांत. विश्वास देखील, नैतिकतेचे आव्हान स्वीकारतो, परंतु केवळ देवाच्या सामर्थ्याचे साधन बनण्याचा एक प्रसंग म्हणून. आणि जेव्हा विजय मिळविला जातो तेव्हा विश्वास आनंद करतो कीं सर्व गौरव आणि उपकारस्तवन देवाचे आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *