तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला; नंतर ते त्या घरात गेलें तेव्हां तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केलें. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली. (मत्तय 2:10-11)
देवाला काही उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडत नाहीं (प्रे. कृत्ये 17:25). मागीं लोकांनी आणलेली दानें ही त्याची काहीं मदत व्हावी किंवा त्याची एखादी गरज पुरवावी म्हणून देण्यात आली नाहींत. जर विदेशी पाहुणें राज-घराण्यासाठीं मदत म्हणून दान घेऊन जर येत असतील तर यापेक्षा अधिक अनादर एखाद्या सम्राटाचा होऊ शकत नाहीं.
ही दानें लाच स्वरूपांत देखील नव्हती. अनुवाद 10:17 म्हणते कीं देव लाच घेत नाहीं. तर मग, त्यांचा अर्थ काय? त्यांचे स्वरूप उपासना कसे काय आहे?
श्रीमंत आणि स्वतःमध्यें समर्थ अशा लोकांस दिलेंली दानें किंवा बक्षिसे देणाऱ्याच्या इच्छेचे प्रतिध्वनी आणि रंजक आहेत, ज्यामुळें घेणारा हा किती महत्वाचा व्यक्ती आहे हे दाखविलें जाते. एका अर्थाने, ख्रिस्ताला दानें देणें उपवास करण्यासारखे आहे – एखाद्या वस्तुवाचून राहणें, हे दाखविण्यासाठीं कीं तुम्हीं ज्या गोष्टीचा त्याग करीत आहात त्यापेक्षा ख्रिस्त अधिक मौल्यवान आहे.
जेव्हां तुम्हीं ख्रिस्ताला या प्रकारे दानें देता, ते असे म्हणण्याची एक पद्धत आहे कीं, “मला ह्यामुळें तो अतिशय आनंद प्राप्त होतो ज्याच्या मी शोधांत असतो” (मत्तय 2:10 कडें लक्ष द्या! “तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला”) – ज्या आनंदाचा मी शोध घेतो तो तुमच्याशी विनिमय करण्याद्वारे अथवा एखाद्या रकमेविषयी वाटाघाटी करण्याद्वारे श्रीमंत होण्याची आशा नव्हे. मी वस्तूंसाठीं तुमच्याकडें आलो नाहीं, परंतु स्वतः तुमच्यासाठीं आलो आहे. आणि आता मी वस्तूंचा त्याग करण्याद्वारे, वस्तूंचा नव्हे तर तुझा आणखी आनंद घेण्याद्वारे आता मी ही इच्छा प्रगट करतो आणि तीव्र करतो. ज्याची तुला गरज नाहीं, आणि ज्याचा मी आनंद घेऊ शकतो ते तुला देण्याद्वारे, मी आणखी आग्रहाने आणि आणखी खरेपणाने म्हणत आहे, “माझी संपत्ती या वस्तू नाहीं, तू आहेस,.”
मला असे वाटते कीं सोने आणि ऊद आणि गंधरस यांची दाने देऊन देवाची उपासना करण्याचा हाच अर्थ आहे. किंवा ते सर्व जें आम्हीं देवाला देण्याचा निर्धार करतो.
देव आमच्या ठायीं प्रत्यक्षात ख्रिस्तासाठीं एक इच्छा उत्पन्न करो. आपण अंतःकरणापासून म्हणावे, “प्रभु येशू, तू इस्राएलचा राजा ख्रिस्त आहेस. सर्व राष्ट्रे येऊन तुजपुढे नमन करतील. जगाने तुझी उपासना याची खात्री करून घेण्यासाठीं देव ह्या जगाला चालना देतो. म्हणून, मला जो विरोध आढळून येतो, त्यांत मी आनंदाने तुला सर्व अधिकार व प्रतिष्ठेचे श्रेय देतो, आणि माझी दानें घेऊन अंगीकार करितो कीं माझ्या अंतःकरणाची तहान केवळ तूच तृप्तकरू शकतोस, या दानांना बिलगून राहण्याने नाहीं.