1 September : त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो

Alethia4India
Alethia4India
1 September : त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो
Loading
/

आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. (स्तोत्र 115:3)

हे वचन शिकवते कीं देव ज्या ज्यावेळी एखादे कार्य करतो, तो ते त्याला योग्य दिसते त्याप्रमाणें करतो.

देवाला ज्या गोष्टीचा तिटकारा वाटतो ती करण्यास तो बंधनकारक नाहीं. त्याच्यावर असला प्रसंग कधीही येत नाहीं जिथे त्याला एखाद्या गोष्टीचा एकमात्र तोडगा काढण्यासाठीं असे काहींतरी करणें भाग पडते जे त्याला योग्य दिसत नाहीं.

त्याच्या इच्छेस येईल ते तो करतो. आणि म्हणूनच, एका अर्थाने, तो जे काहीं करतो त्यापासून  त्याला आनंद होतो.

हे असे ज्ञान आहे कीं आपण देवासमोर नतमस्तक होऊन त्याच्या सार्वभौम स्वातंत्र्याची स्तुती करण्यास प्रवृत्त झालों पाहिजे – म्हणजें असे कीं, त्याला जे योग्य व संतुष्टीदायक आहे त्यावर अंमलबजावणी करून तो नेहमी आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार  स्वत: च्या “सत्संकल्पाप्रमाणें” सर्वकाहीं करतो.

देव कधीच कुठल्याही परिस्थितीला बळी पडत नाहीं. त्याच्यावर अशी परिस्थिती कधीही उद्भवत नाहीं जी त्याला असे काहींतरी करण्यांस आवरून धरते ज्यामध्यें तो आनंद करू शकत नाहीं. त्याचा उपहास व्हायचा नाहीं. गुप्तपणें फासा मांडून त्याला अडकविले जाऊ शकत नाहीं, किंवा त्याच्या इच्छे विरुद्ध काहीं करण्यांस त्याच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाहीं.

देवासाठीं एका अर्थाने सर्वात कठीण जर एखादी गोष्ट असेल जी त्यानें इतिहासात एका समयी केलीं तर ती म्हणजें, जेव्हां त्यानें “आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून” ठेविले नाहीं (रोम 8:32). देव स्वतंत्र होता आणि त्याला जे योग्य दिसायचे ते सर्व तो करत असे. पौल म्हणतो कीं ख्रिस्तानें मरण सोसून जेव्हां स्वतःला अर्पण केलें, ते त्यानें “देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिलें” होते (इफिस 5:2). जगात घडलेले हे महापाप, आणि हे महामरण, व सर्वात कठीण अशी देवाची ही कृती, हे सर्व गोपनीय दृष्ट्या पित्याला जे योग्य दिसते त्याप्रमाणेंच झालें.

आणि कॅल्वरीच्या कृसाकडें जात असतांना, साक्षांत देवदूतांचे सैन्य त्याची सेवा करीत होते. “कोणी [माझा जीव]  माझ्यापासून घेत नाहीं, तर मी होऊनच तो देतो” (योहान 10:18) — त्याला जे योग्य दिसले — आणि इब्री 12:2 म्हणते त्याप्रमाणें हे सर्व त्यानें “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्यासाठीं केलें. विश्व-इतिहासाची ही वेळ जिथे असें दिसत होते कीं जणू येशूला फासा मांडून अडकविले गेलें, त्या सर्व घटनाक्रमावर पूर्णपणें त्याचेच आधिपत्य होते आणि त्याला जे योग्य दिसलें तेच तो करत होता – म्हणजें आम्हां अनीतिमानांना नीतिमान ठरविण्यात देवाच्या नीतिमत्वाचे गौरव व्हावें म्हणून त्यानें मरण पत्करले.

तर, आपण भय व आदर मानूं. आणि “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” यावर देवाच्या सार्वभौमत्वाविषयी आपल्या स्तुतीचाच नाहीं तर आम्हांसाठीं ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे जे तारण साध्य करणांत आलें त्याचा पाया देखील यावरच बांधलेला आहे, हे जाणून आपण थरथर कापूं:

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *