1 November : आमच्याठायीं ख्रिस्ताचे क्लेश

Alethia4India
Alethia4India
1 November : आमच्याठायीं ख्रिस्ताचे क्लेश
Loading
/

तुमच्यासाठीं जी माझी दुःखे त्यांमध्यें मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतलें जे उरलें आहे ते मी आपल्या देहानें, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठीं भरून काढत आहे. (कलस्सै 1:24)

ख्रिस्तानें पापी लोकांसाठीं क्लेश व मरण सोसून जगासाठीं प्रेमार्पण तयार केलें आहे. ते एक सिद्ध-साध्य बलिदान आहे. त्याद्वारें त्यानें त्याच्या सर्व लोकांच्या सर्व पातकांसाठीं पूर्ण खंडणी भरलीं. हे दान इतके उत्तम आहें कीं त्यांत कांहींही जोडता येऊ शकत नाहीं. त्यात कसलीही उणीव नाहीं – फक्त एक गोष्ट सोडून, स्वतः ख्रिस्ताद्वारें जगातील राष्ट्रांसमक्ष वैयक्तिक प्रस्तुती.

ही उणीव भरून काढण्यासाठीं परमेश्वराचा उपाय हा कीं तो ख्रिस्ताच्या लोकांना (पौलासारखे लोक) जगासमोर ख्रिस्ताच्या क्लेशांचे वैयक्तिक प्रस्तुतीकरण करण्यासाठीं पाचारण करतो. हे क्लेश भोगून, आपण “ख्रिस्ताच्या क्लेशांत जी उणीव आहे ती भरून काढतो.” देवानें त्यां क्लेशांना ज्यां उद्देशाने नेमिलें होते तो उद्देश आपण पूर्ण करतो, म्हणजेच, ज्यां लोकांना ते देवाच्या दृष्टीनें किती असीम मौल्यवान आहेत हे समजत नाहीं अशा लोकांसमक्ष ख्रिस्ताच्या क्लेशांचे वैयक्तिक सादरीकरण.

परंतु कलस्सै. 1:24 बाबत सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजें याचे प्रदर्शन कीं पौल ख्रिस्ताच्या क्लेशांत असलेलीं उणीव कशी भरून काढतो.

तो म्हणतो कीं तो आपल्या स्वतःच्या क्लेशानें ख्रिस्ताचे क्लेश भरून काढतो. तर मग, याचा अर्थ हा आहे कीं, पौल ज्यांना ख्रिस्तासाठीं जिंकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठीं तो स्वतः दुःख सोसून ख्रिस्ताचे क्लेश प्रदर्शित करतो. म्हणजें त्याच्या क्लेशात त्यांना ख्रिस्ताचे क्लेश दिसलें पाहिजेत.

याचा थक्क करणारा अंतिम निष्कर्ष हा : ख्रिस्ताचे क्लेश हें त्याच्या लोकांच्या क्लेशांद्वारें जगापुढे मांडावे हा देवाचा हेतू आहे.

ख्रिस्ताचे शरीर जी मंडळी तिच्यासाठीं परमेश्वराचा हेतू खरोखर हा आहे कीं त्यानें अनुभवलेंल्या कांहीं क्लेशांचा अनुभव तिनें  सुद्धा घ्यावा यासाठीं कीं जेव्हां आपण जीवनाचा मार्ग म्हणून वधस्तंभाची घोषणा करूं, तेव्हां लोकांनी आपल्यामध्यें वधस्तंभाच्या खुणा पाहाव्यांत आणि आम्हांद्वारें त्यांस वधस्तंभाच्या प्रीतिची जाणीव व्हावीं.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *