1  May : घाणेरडी वस्त्रे आता नाहीं

Alethia4India
Alethia4India
1  May : घाणेरडी वस्त्रे आता नाहीं
Loading
/

आम्हीं सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो ; आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. ( यशया 64:6 )

हे सत्य आहे कीं देवाचे नियमशास्त्र पाळण्यात झालेंली उणीव त्याच्या परिपूर्ण पावित्र्याला असंतुष्ट करते, व आपल्याला न्यायदंडास पात्र ठरवते कारण देव कोणत्याच पापाकडे कृपेने पाहू शकत नाहीं  ( हबक्कुक 1:13, याकोब 2:10 -11).

परंतु जुन्या करारामध्यें (व आज देखील हे असेंच आहे) व्यक्तिचा नाश ह्यामुळें होत नसे कीं तो पापविरहित परिपूर्णता प्राप्त करू शकत नसे. त्यांचा नाश यामुळें होत असें कीं, ते देवाच्या दयेच्या अभिवचनावर विश्वास ठेवण्यात अपयशी ठरत असत, विशेषत: ही आशा धरून राहण्यात कीं एक दिवशी देव त्यांना एक तारणकर्ता देईन जो त्याच्या लोकांकरिता सिद्ध असें नितीमत्व होईल “परमेश्वर आमची नीतिमत्ता” ( यिर्मया 23:6, 33:16). जुन्या करारातील पवित्र जनांना ठाऊक होते कीं त्यांचे तारण अशा प्रकारेच  होणार होते, आणि विश्वास हा आज्ञापालनाची गुरुकिल्ली होती, आणि आज्ञापालन हा त्यांच्याह्यांच विश्वासाचा पुरावा होता.

ही गोष्ट खूप गोंधळात टाकणारी आहे, जेव्हां लोक म्हणतात कीं केवळ ख्रिस्ताकडून प्राप्त होणार्‍या नीतीमत्त्वालाच मोल आहे. हे खरे आहे कीं. आपले नीतिमान ठरवले जाणे, आपल्या नीतीमत्वावर अवलंबून नसते – आत्म्याद्वारें देऊ केलेल्यां विश्वासाद्वारें नीतिमान बनणे देखील – नीतीमत्व केवळ ख्रिस्ताद्वारें आपल्याला प्राप्त होते. पण लोक काहीवेळा अविचाराने, मनुष्याच्या सर्व नीतीमत्वाला  तुच्छता पूर्वक पाहतात, जसे कीं आपल्यामध्यें कोणत्याच नीतीमत्वाचे कार्य झालें नाहीं ज्याच्यामुळें देवाला संतोष प्राप्त झाला नाहीं, परंतु असें म्हणने उपयोगाचे नाहीं.

ते नेहमी यशया 64:6 चा संदर्भ देतात ज्या मध्यें आपली धर्मकृत्ये “घाणेरड्या वस्त्रासारखी” आहेत असें संगितले आहे.

पण, यशया 64:6 चा संदर्भ पाहता, देवाच्या लोकांची सर्वच धर्मकृत्ये देव स्वीकारत नाहीं असें नाहीं. यशया अश्या लोकांबद्दल बोलत आहे ज्यांचे नीतीमत्व ढोंगीपणाचे आहे. ते खरे नीतीमत्व नाहीं. ह्या वचनाच्या आधीच्या वचनामध्यें यशया म्हणतो, “जे आवडीने धर्माचरण करतात त्यांना तू भेट देतोस ” (यशया 64:5).

हे निर्विवादपणे सत्य आहे कीं – येशूच्या क्रूसापूर्वी आणि नंतर, देवाच्या कोणत्याच लोकांचा स्वीकार  पवित्र देवाच्या पुढे झाला नसता जर त्यांच्याकडे ख्रिस्ताचे नीतीमत्व नसते ( रोम 5:19; 1 करिंथ. 1:30; 2 करिंथ 5:21). हे खरे आहे ! पण याचा अर्थ असा होत नाहीं कीं, देव त्या  नीतिमान” ठरलेल्यां लोकांमध्यें नीतीमत्वाचे कार्य करत नाहीं, जे परिपूर्ण नसले तरी “घाणेरड्या वस्त्रासारखी” नाहीं. खरें पाहता, तो त्यांच्या मध्यें नीतीमत्व निर्माण करतो, आणि हे नीतीमत्व देवासाठीं मौल्यवान आहे, आपल्याला नीतिमान ठरवण्याकरिता नाहीं (कारण आपण केवळ ख्रिस्ता द्वारेंच  नीतिमान ठरतो ), तर आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेली देवाची लेकरे आहे याचा पुरावा म्हणून. आणि याच करिता पौल प्रार्थना करतो, आणि आपण देखील हीच प्रार्थना केलीं पाहिजे, जी त्यानें फिलिपै 1:10-11 मध्यें केलीं “असें कीं, जे श्रेष्ठ ते तुम्हीं पसंत करावे ; तुम्हीं ख्रिस्ताच्या दिवसासाठीं निर्मल व निर्दोष असावे ; आणि देवाचे गौरव व स्तुति व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारें जे नीतीमत्त्वाचे फळ त्यानें तुम्हीं भरून जावे.”

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *