तो ( पिलात ) पुन्हां सरकारवाडयात जाऊन येशूला म्हणाला, “तू कुठला आहेस?” परंतु येशूनें त्याला उत्तर दिले नाहीं. पिलाताने त्याला म्हटलें, ” माझ्याबरोबर तू बोलत नाहींस काय ? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाहीं काय ?” येशूनें उत्तर दिले, ” आपणाला वरुन अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता ; म्हणून ज्यानें मला आपल्यां स्वाधीन केलें त्याचें पाप अधिक आहे. ” – योहान 19 : 9-11.
पिलाताकडें येशूला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार होता, पण त्या गोष्टीचा येशूला धाक वाटली नाहीं.. असे का बरे?
असे नव्हते कीं पिलात खोटे बोलत होता किंवा येशूला वधस्तंभावरखिळण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्याला तो अधिकार होता.
तर, येशूला त्याच्या अधिकाराचे भय वाटले नाहीं याचे कारण हें कीं त्याचा अधिकार हा दिलेला अधिकार होता, तो अधिकार त्याला “देवाकडून प्राप्त झाला होता.’ येशू म्हणाला कीं, “तुला वरून अधिकार प्राप्त झाला आहे.” म्हणजेच त्याला अधिकार होता, निश्चितच जास्त प्रमाणात अधिकार होता.
मग ह्या गोष्टीचा धाक वाटणे योग्य होते ना? पिलाताला येशूला केवळ मारण्याचा अधिकार नव्हता तर, मारण्याचा तो अधिकार त्याला देवानें देऊ केलेला होता.
येशूला त्याच्या अधिकाराची भीती वाटली नाहीं कारण पिलाताचा येशुवरील अधिकार हा देवाच्या पिलातावरील अधिकाराच्या दुय्यम दर्जाचा होता. येशूला त्या क्षणी सांत्वन प्राप्त झाले कारण पिलाताची इच्छा ही दुर्बळ नसून, त्याची इच्छा ही मार्गदर्शित होती. येशू हा पिलाताच्या हातात नसून, पिलात येशूच्या पिताच्या हातात होता.
याचा अर्थ आपल्यांला सांत्वन यातून प्राप्त होत नाहीं कीं आपला शत्रू दुर्बळ आहे, तर आपल्यांला सांत्वन यातून प्राप्त होते कीं “आपल्यां शत्रूच्या बळावर देखील आपल्यां पित्याचा सार्वभौम अधिकार आहे.”
रोमकरास पत्र 8:35-37, मध्यें हाच मुद्दा नमूद केला आहे, क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकटे किंवा तलवार आपल्यांला ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाहींत, “कारण ज्यानें आपल्यांवर प्रीति केलीं त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो.”
पिलात व येशूच्या इतर शत्रूंनी जे वाईटासाठीं योजले (व आपले शत्रू जे आपल्यां वाइटासाठीं योजतात) ते सर्व, देव आपल्यां चांगल्यांसाठीं योजतो (उत्पत्ती 50:20). येशूचे सर्व शत्रू एकत्र येऊन, त्यांना देवानें दिलेल्यां आधिकारानी, “जे काहीं घडावें म्हणून देवानें स्वहस्ते व देवाचा संकल्पानें पूर्वी योजलें होते ते त्यांनी केलें” (प्रेषित 4:28). त्यांनी पाप केलें, पण त्यांचा पापाद्वारें देवानें तारण घडवून आणिलें.
यासाठींच, आपले शत्रू जे केवळ आपल्यां शरीराचा नाश करू शकतात त्यांचे भय बाळगण्याचे कारण नाहीं (मत्तय 10:28) ते एवढेच करू शकतात म्हणून नाहीं तर (लुक 12:4), ते जे काहीं करतात ते आपल्यां दक्ष पिताच्या हाताखाली करतात.
पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात कीं नाहीं? तरी त्यांच्यापैकीं एकींचाही देवाला विसर पडत नाहीं. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्हीं अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. (लूक 12:6-7)
पिलाताकडें अधिकार होता. हेरोदाकडें अधिकार होता. सैनिकांकडें अधिकार होता. सैतानाकडें अधिकार आहे. पण त्यांचा अधिकार स्वायत्त/स्वतंत्र नाहीं. त्या सर्वांचा अधिकार हा त्यांना देण्यांत आलेला अधिकार आहे, पण सर्व अधिकार देवाच्या इच्छेच्या अधीन आहे, दुसऱ्या दर्जावर आहे. भय बाळगू नका. तुम्हीं तुमच्या सार्वभौम पित्यासाठीं मौल्यवान आहात. ज्या चिमण्यांचा देवाला विसर पडत नाहीं, तुम्हीं त्या चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.