देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायीं असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून : (2 थिस्सल 1:1)
मंडळी या नात्यानें आपण पित्याच्या “ठायीं” आणि प्रभूच्या “ठायीं” आहोत. याचा अर्थ काय? “पिता” हा शब्द मूलतः निगा आणि सांभाळ आणि संरक्षण आणि प्रयोजन आणि शिस्त सूचवितो. म्हणून, पित्याच्या “ठायीं” असण्याचा अर्थ मुख्यतः आमचा स्वर्गीय पिता म्हणून देवाच्या संरक्षणात आणि निगेत असणे असा होईल.
दुसरी पदवी आहे प्रभू : आम्हीं प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायीं आहोत. “प्रभू” हा शब्द मुख्यत्वे करून अधिकार आणि नेतृत्व आणि स्वामित्व सूचित करतो. म्हणून, प्रभूच्या “ठायीं” असण्याचा अर्थ मुख्यत्वे करून जबाबदार असणे, अधिकाराधीन असणे, आणि आमचा परम श्रेष्ठ प्रभू म्हणून येशूच्या मालकींचे असणे असा आहे.
म्हणून, पौल थेस्सलोनिया येथील मंडळीस अशाप्रकारे अभिवादन करतो कीं त्यांस आठवण करून दिली जावी कीं ते एक कुटुंब (पित्याच्या निगेत) आहेत, आणि ते सेवक (प्रभूच्या आज्ञेत) आहेत. पिता आणि प्रभू म्हणून देवाची ही दोन वर्णने आणि अशाप्रकारे कुटुंब आणि सेवक म्हणून मंडळीचे असणे, आमच्यां दोन सखोल गरजानुरूप आहेत.
एकींकडें, आमच्यांपैकीं प्रत्येकाला सुटकेची आणि मदतीची गरज आहे, आणि दुसरीकडें जगण्याचा हेतू आणि जीवनाला अर्थाची गरज आहे.
- आमच्यांवर दया करण्यासाठीं आणि पाप आणि दुःखापासून आम्हास मुक्त करण्यासाठीं आपल्याला स्वर्गीय पित्याची गरज आहे. आपल्याला प्रत्येक पावलावर त्याच्या मदतीची गरज आहे, कारण आपण अतिशय दुर्बळ आणि संवेदनशील आहोत.
- आम्हास जीवनात मार्गदर्शन करण्यासाठीं आणि काय बुद्धिनुरूप आहे हे सांगण्यासाठीं आणि आपल्याला एक थोर आणि अर्थपूर्ण जबाबदारी, आणि अस्तित्वाचे कारण, देवानें आम्हास जसे घडविले आहे त्यासाठीं काहीं उपयुक्तता देण्यासाठीं स्वर्गाच्या प्रभूची देखील गरज आहे. आम्हीं फक्त पित्याच्या काळजीत सुरक्षित राहू इच्छित नाहीं – अर्थातच, ते मूल्यवान आणि आवश्यक आहे. पण आम्हास जगण्यासाठीं एक गौरवी निमित्त देखील हवे आहे.
एक दयाळू पिता आमचा रक्षक असावा अशी आमची इच्छा आहे, आणि सर्वशक्तिमान प्रभूने एखाद्या मोठ्या उद्देशासाठीं आमचा विजेता आणि आमचा सेनापति आणि आमचा पुढारी असावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून पौल पहिल्या वचनात म्हणतो कीं तुम्हीं “पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ठायीं” मंडळी आहात, म्हणून आपण त्याजपासून विसावा आणि मदत प्राप्त करू शकतो – देव आमचा पिता आहे! आणि आम्हीं दुसर्यापासून धैर्य आणि अर्थ प्राप्त करू शकतो – येशू आमचा प्रभू आहे!