तरी जो कांही मी आहें तो देवाच्या कृपेनें आहें आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षां मीं अतिशय श्रम केले, ते मीं केले असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेनें केले. (1 करिंथकरांस 15:10).
कृपा म्हणजे देवाचा केवळ स्वभावगुण नव्हे ज्याद्वारे तो आमची लायकी नसतांनाहि आमच्यासाठीं काहीतरी चांगले घडवून आणतो. तर ती देवा कडून असलेलें वास्तविक सामर्थ्य आहे जें सतत आमच्या ठायीं आणि आमच्यासाठीं कृति करते व आमच्या ठायीं आणि आमच्यासाठीं उत्तम अशा गोष्टी घडवून आणते.
पौलाला अतिशय श्रम करण्यासासाठीं चालना मिळावी म्हणून देवाची कृपा पौलाच्या ठायीं देवाची कृति साधून देत होती: “देवाच्या कृपेनें . . . ह्या सर्वांपेक्षां मीं अतिशय श्रम केले.” म्हणून जेव्हा पौल म्हणतों, “भीत व कांपत आपले तारण साधून घ्या,” तो पुढे असेहि म्हणतो, “कारण इच्छा करणें व कृति करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे” (फिलिप्पै 2:12-13). कृपा ही देवापासून येणारे सामर्थ्य आहे जे आमच्या ठायीं आणि आमच्यासाठीं उत्तम अशा गोष्टी घडवून आणते.
आम्हांवर हीं कृपा गतकाळात झालीं आणि ती भावी काळातहि होणार आहे. ती वर्तमान समयाच्या अमर्याद झऱ्यावर सतत होणारा वर्षाव आहे, तो झरा तर भविष्यातून आमच्याकडे वाहत येणाऱ्या कृपेच्या अक्षय नदीतून वाहत आम्हांवर गतकाळात झालेल्या कृपेच्या सतत वाढत जाणाऱ्या जलाशयात भरती करतो.
पुढच्या पाच मिनिटांत, तुमच्या आत्म्याचे पोषण करणारी कृपा तुम्हांला प्राप्त होईल जी तुमच्याकडे भावीकाळातून वाहत येते, व तसेच तुम्हीं गतकाळाच्या कृपेच्या जलाशयात आणखी पाच मिनिटांची कृपा साठवून ठेवाल. गतकाळात तुम्हांवर झालेल्या कृपेला योग्य प्रतिसाद म्हणजे देवाचे आभार मानणे, आणि भविष्यात तुम्हांवर होणाऱ्या कृपेच्या अभिवचनाला योग्य प्रतिसाद म्हणजे विश्वासात स्थिर राहणे. गेल्या वर्षाच्या गतकाळातील आम्हांवर झालेल्या कृपेबद्दल आम्हीं देवाचे आभार मानतो, आणि ह्या नवीन वर्षासाठीं सुद्धा तो आम्हांला भविष्यातील कृपा पुरवेल असा आम्हीं विश्वास धरितो.
1 जानेवारी: नवीन वर्षासाठी कृपा
/
RSS Feed
आमेन, मी विश्वास ठेवतो कि, नवीन वर्षासाठी देव मला भविष्यातील विपुल कृपा परणार आहे.