तुमचे आयुष्य वाया घालवू नका
आपले आयुष्य वाया न घालवणे म्हणजे इतरांना देवामध्ये आनंदित करण्यासाठी जगणे होय. जर तुम्ही असे केले तर तुमचे जीवन कठीण होईल, तुम्हाला मोठमोठे धोके जोखमी पत्करावे लागतील आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. मराठी पॉडकास्ट ऐका कारण ते तुम्हाला देवाच्या गौरवासाठी आत्मिक तृप्ती करणारे जीवन जगण्याचे आव्हान देईल.
“ख्रिस्तात सर्वाना सलाम, आपल्या Don’t Waste Your Life (तुमचे आयुष्य वाया घालवू नका!) या पुस्तकावर आधारित आपल्या पहिल्या पोडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या पोडकास्टमध्ये आपण एक महत्वाचा संदेश घेऊन येत आहोत – जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि आपण त्याचा उपयोग योग्य रीतीने कसा करू शकतो. जॉन पायपर यांच्या या पुस्तकामध्ये जीवनाच्या मूल्याच्या, परमेश्वराच्या महिम्याच्या आणि आपल्याला दिलेल्या वेळेचा कसा सदुपयोग करावा यावर विचारमंथन केले…
“तुम्हांला जीवनांत एकच संधी मिळते, बस एवढेच. फक्त एकच. आणि त्या जीवनाचा चिरकाळ टिकणारा मापदंड म्हणजे येशू ख्रिस्त.”
"तुमचे मन यासाठीच बनवले गेलें होते कीं तुम्हीं देवाला ओळखावे आणि त्याजवर प्रीति करावी."
“तुमच्या जीवनातून काहीं तरी पराक्रमी अशी गोष्ट घडून यावीं अशी अपेक्षा करा! तुमच्या आयुष्याला चिरकाळ टिकणारा अर्थ प्राप्त व्हावा अशी उत्कंठा बाळगा. त्यासाठी तहानलेले असां! जीवनाचा प्रवास आवेशविरहित पूर्ण करूं नकां."
"जेव्हां आपण देवामध्यें सर्वात जास्त आनंदी व समाधानी असतो तेव्हां तो आपल्यामध्यें सर्वात जास्त गौरवविला जातो."
“देवाचा देवाकरिता असणारा आवेश आमच्यासाठी असणार्या देवाच्या करुणेचा पाया आहे.”
"भारतातील मंडळीला सत्यात आणि विश्वावासात वाढण्यास सुसज्ज करण्यासाठी पवित्र शास्त्र केंद्रित साहित्याचा अभ्यास करा."