Questions and Answers with John Piper
आस्क पास्टर जॉन - जीवन कठीण आहे आणि अनेकदा आपल्याला देवाबद्दल अवघड प्रश्न विचारायला भाग पडते. पवित्र शास्त्रातून ह्या प्रश्नांची उत्तरे देताना जॉन पायपर ह्यांना ऐका.
मंडळीला अनौपचारिक संस्कृतीतून बाहेर आणणे.
पुन्हा एकदा पास्टर जॉन यांना विचार या मराठी पोडकास्ट मध्ये तुमचेस्वागत आहे,
आम्ही “गोंधळ” म्हटल्या गेलेल्या ऑनलाईन वादामध्ये परत आलेलो आहोत. पास्टर जॉन आपण 30 सप्टेंबर रोजी कॉफी बाबत ट्वीट केले. आणि तुम्ही इब्री 12:28 पोस्ट केले जे असे म्हणते, “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.” आणि ह्या आदर व भययुक्त आराधनेच्या दृष्टांताच्या प्रकाशात आपण हा खुला प्रश्न मांडला: “रविवारी भक्तिमंदिरात कॉफी पिणे योग्य आहे का, ह्या बाबत पुनर्विचार करता येईल का?”
मी मागेच सांगितल्याप्रमाणे, ह्या ट्वीटला पसंत करण्यात आले आणि नापसंतही करण्यात आले आणि ती इंटरनेटवर इतकी पसरली की काही आठवड्यातच तिला 1000 ट्वीट्स, 1500 कॉमेंट्स, 3000 लाईक्स, 2.5 दशलक्ष व्ह्यूज, आणि अमेरिकेतील फॉक्स न्युजद्वारे आणि युके मधील डेली मेल द्वारे ऑनलाईन विशेष लेख प्राप्त झाले. आता त्या ट्वीटमागे भरपूर काही आहे, खरेतर पूर्ण जगिक दृष्टिकोण. म्हणून आम्ही त्यामागील संदर्भ उभारत आहोत, आणि तुम्ही रविवारी सकाळी जे सर्व घडते त्यामध्ये मंडळीला ह्या आदरयुक्त अनुभूतीने कसे आकार देऊन उभारता येईल ह्याबाबत बोलत आहात. मागील वेळी तुम्ही असे दर्शविले की तुम्ही मंडळीच्या पुढार्यांना मंडळीला अनौपचारिक भक्ती पासून इब्री लोकांस पत्र आणि पवित्र शास्त्र पाचारते त्या अधिक उत्तम आणि योग्य अशा भक्तिप्रत घेऊन जाण्याचे वास्तविक महत्व काय ह्या विषयात प्रवेश करू इच्छिता. म्हणून वास्तविक व्हा, आणि आम्हाकरिता ह्या मुद्दयावर आपली चर्चा हाती घ्या.
मी मागच्यावेळी युक्तिवाद मांडला की मंडळीतील आराधनेच्या पवित्र वेळी कॉफी पिणे हे इब्री. 12:28 मध्ये अपेक्षित आदर व भयाशी सुसंगत नाही. कारण इब्री लोकांस पत्र म्हणते, “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.”
परंतु मी युक्तिवाद केला की कॉफी पिणे हा मध्यवर्ती मुद्दा नाही. मध्यवर्ती मुद्दा हा आहे की रविवारी सकाळच्या मंडळीच्या आराधनेच्या तासाची पवित्रता ज्याला मी “आदर आणि भय” आणि पावित्रता म्हणतो, ती प्रतिध्वनित करणारी हृदये लोक आणि पुढारी बाळगत नाहीत. त्या वास्तविकता, त्या आदरयुक्त वास्तविकता त्यांच्या मनात आणि हृदयात प्रमुख नाहीत. त्यांना आदर, भय हे शब्द माहित आहेत. त्यांना शब्द माहित आहेत, परंतु त्या शब्दांमध्ये सक्तिचा अस्तित्ववादी मान नाही, लोकांना आदर आणि भयाची ओढ लावणारा गंभीर आनंद नाही. ते केवळ शब्द आहेत.
आणि मी युक्तिवाद केला की तुम्ही बाह्यात्कारी नियम बनवून ही समस्या सोडवू शकत नाही. अंतर्गत, हृदयस्पर्षी आदर जागृत करून ही समस्या सोडविली जाऊ शकेल. म्हणजे, ज्या गोष्टी सुसंगत नाहीत त्या बहिष्कृत होत नाहीत; त्या आपोआपच गळून जातात. मला असे वाटते मी त्याप्रमाणेच ते करण्याचा प्रयत्न केला आहे. मी 33 वर्षाच्या माझ्या उपदेशांमध्ये कधीच असे नियम मांडले नाहीत.
मला ह्या ठिकाणी पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये पाळक लोकांना मंडळीला क्रमश: पुढे चालविण्याचा वास्तविक मार्ग दाखवायला आवडेल. आपण अनौपचारिक, स्वस्त, कॉफीचे घोट घेणार्या, मनोरंजन केंद्रित सामुहिक सभांपासून देवाच्या अधिक गांभिर्ययुक्त आनंदी, आदरयुक्त, सखोल समाधानकारी भेटीकडे जाण्यास संयम बाळगला पाहिजे. म्हणून, टोनी, ह्या एपिसोडमध्ये आपण काही मिनिटे अशा उपदेशांबद्दल बोलू शकतो जे त्या दिशेने आपणास चालवू शकतील.
देवाप्रत असणारी वृत्ती विकसित करणे
परंतु ते म्हणण्यापूर्वी, पाळकाची एकून वृत्ती अशी असावी की आठवड्यातून तास-दिड तास देवाचे लोक त्यांच्यासोबत अशा क्रांतिकारी देवाप्रत असणार्या मनाने भेटतील ज्यामध्ये भारदस्तपणा आणि गांभीर्य आहे, आणि तो देवकेंद्रितेचा भारदस्तपणा आणि गांभीर्य हे आमच्या लोकांच्या जिवनांमध्ये सर्वात समाधानकारक अनुभव व्हावा. आम्हाला अशी वृत्ती असावयास हवी : “मला हे असे करायचे आहे की त्यांना ते आवडेल, त्यांना ते पाहिजे असेल, ह्याकरिताच ते येतील. “आता हे सहन करावे लागणार असे नाही तर ह्याची अपेक्षा केली जाईल.” अशी वृत्ती त्यांच्या ठायी निर्माण व्हावी.
आपण जगापेक्षा जास्त मनोरंजन कधीच करू शकणार नाही. हे मला ह्या ठिकाणी शिक्कामोर्तब करू द्या. आपण जगापेक्षा जास्त मनोरंजन कधीच करू शकणार नाही, आणि आपण त्याचा प्रयत्नही करू नये, कारण आमच्याजवळ त्याच्यापेक्षा अमर्यादरीत्या उत्तम काहीतरी आहे, असे की ज्याकरिता आमचे आत्मे निर्माण केलेले आहे.
आणि आमच्या बहुतांश लोकांना हे माहित नाही. व्हीडीओज बघणे आणि इतर मनोरंजनाच्या मजेशीर साधनांपेक्षा अधिक उत्तम काय आहे हे त्यांना माहित नाही. त्यांना हे माहितच नाही. त्यांनी खर्या गोष्टीचा कधी स्वादच घेतलेला नाही. असे काहीतरी जे आमच्या अंतर्यामी सर्वांगीणरीत्या स्थैर्य देणारे, शक्ती देणारे, शुद्ध करणारे, आणि समाधान देणारे जे आहे त्याची ओढ लोकांना असते, आणि त्यांना कशाची ओढ आहे हे त्यांना ते वारंवार दाखविल्याशिवाय समजणार नाही.
म्हणूनच उपदेशाच्या संदर्भात पाळकांना ह्या पाच विनंत्या आहेत.
1. पवित्र शास्त्राचे लोक उभारा
लोकांचे लक्ष पवित्र शास्त्रावर, त्याच्या शब्दांवर खिळवा. महान वास्तविकता हाताळा, आणि त्यांना त्या वास्तविकता पवित्र शास्त्रभागांमधून दाखवा. पवित्र शास्त्रावर भरवसा निर्माण करा. पवित्र शास्त्राचा व्यक्ती म्हणून तुमच्यामध्ये भरवसा निर्माण करा, जेणेकरून लोक म्हणतील, “आपण त्याच्यावर भरवसा ठेऊ शकतो कारण तो पवित्र शास्त्राचा माणूस आहे.”
ह्या भुमिकेमुळे काही लोक मंडळी सोडून जातील; पवित्र शास्त्राला अशा प्रकारे अधीन होणे हे जास्तच भीतिदायक आणि धाकात ठेवणारे आहे. इतर ह्यासाठी भुकेले आहेत, आणि ते घरी जातील. कालंतराने, लोकांना असे घडविण्याचा प्रयत्न करा की ज्यांची मनोवृत्ती आत्मजागृतीने आणि आनंदाने पवित्र शास्त्राच्या अधिकाराच्या अधीन आहे. असे लोक घडविण्याचा प्रयत्न करा जे पवित्र शास्त्रा आधारे सर्व बाबींचे मुल्यमापन करतील. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, ही पवित्र शास्त्राच्या शिक्षणाच्या चाळणीतून चाळून, आणि पवित्र शास्त्र सर्व गोष्टींबाबत खरेच काय शिकवते हे बघितले जाईल.
आपण पवित्र शास्त्र कसे हाताळता आणि त्यातील गौरव कसे बघता त्याद्वारे अशी मंडळी तयार होईल. ते त्यांचे स्वत:चे नाहीत. ते ख्रिस्ताचे आहेत, आणि त्याचा शब्द त्यांचे जीवन आणि त्यांचे नियम आहे. आपल्या पवित्र शास्त्रात मुरलेल्या उपदेशांमधून हे अस्तित्वात येणे गरजेचे आहे.
2. देवाला वर्चस्वकारी वास्तविकता बनवा.
तुम्हाला दर आठवड्यात उपदेश देतांना लोक ऐकतात तेव्हा देवाचे गौरव आणि येशू मध्ये देव जे सर्वकाही आहे ते प्रमुख वास्तव लोक अनुभवतील ह्याची पुढील वर्षांमध्ये खातरी करून घ्या. “देव ह्या ठिकाणी प्रमुख वास्तविकता आहे. देव मोठा आहे. देव भारदस्त आहे. देव अमुल्य आहे. देव समाधान देणारा आहे. देव जवळ आहे. देवाशी खेळ करू नका. देव आपल्यावर प्रीती करतो.” म्हणजे देवाचे हे दर्शन प्रचंड आणि भारदस्त आहे. देवाची महानता, त्याचे सौंदर्य आणि त्याची किंमत ही प्रमुख वर्चस्वकारी वास्तविकता बनवा.
पाळकांनो देवाबाबत सतत विस्मित व्हा, तो प्रारंभाविना जो आहे तो आहे! हे एखाद्या चार वर्षाच्या लेकराचेही चित्त वेधून घेणारे आहे, बरोबर? लेकरू विचारतं, “डॅडी, देवाला कोणी बनवले?” वडील प्रतिसाद देतात, “देवाला कोणीच बनवले नाही.” “वॉह.” डोळे विस्फारतात. “तो नेहमीच होता.” देव सर्वोच्च वास्तविकता आहे. इतर सर्वकाही, तारामंडळापासून तर उपअनु कणांपर्यंत सर्व दुय्यम आहे. आपण बघतो ते सर्व दुय्यम आहे.
देव प्राथमिक वास्तविकता आहे. आपल्या लोकांना देव त्यांच्या जीवनातील प्रत्येक बाबीशी, सर्वदा संबंधीत आहे ही प्रमुख बाब आहे हे बघण्यास आणि जाणण्यास मदत करा. तो त्यांच्या जीवनातील प्रमुख बाब आहे. तो सर्वोच्च खजिना, प्रमुख मुल्य, सर्वात प्रखर आशा, आणि असा आहे ज्या करिता ते जगतील आणि मरतील.
3. त्याच्या क्रोधापुढे कंपायमान व्हा.
आपल्या लोकांना आपल्यातील आणि जगातील पापाच्या विकाराची विदृपता आणि त्याविरुद्ध असणार्या देवाच्या क्रोधाची भयंकरता ह्याची जाणीव असल्याची खातरी करा. जर आपले लोक देवाच्या श्रेष्ठ शुद्धतेच्या वैभवापुढे आणि पापाविरुद्ध त्याच्या पवित्र क्रोधापुढे कंपायमान होणार नाहीत, तर देवाची कृपा, मौल्यवान कृपा ही जशी असावयास पाहिजे तशी विस्मयकारी राहाणार नाही. जर त्यांना पापाविरुद्ध देवाच्या क्रोधाचा प्याला ओतल्या जाण्याच्या कार्यक्षमतेबद्दल जाणीव झाली नाही तर त्यांना ते तारलेले असण्याबाबत कधीच आश्चर्य होणार नाही.
गंभीर आदराद्वारे प्राप्त होणार्या आनंदामध्ये हा एक प्रमुख सहभाग देणारा आहे. देवाचा क्रोध हा गंभीर आदराद्वारे प्राप्त होणार्या आनंदामध्ये एक प्रमुख सहभाग देणारा असावा हे विरोधाभासात्मक आहे, हे मला माहित आहे. परंतु ते तसेच आहे
इमारतीच्या 1500 डिग्री अग्नितून आम्हाला अग्निशामकाद्वारे नुकतेच खेचून काढण्यात आलेले आहे हे अजूनही दिसते. आम्ही बघतो. आम्हाला हे जाणवते. आम्ही सर्व धूर बघतो. तडतडणे आम्हाला ऐकू येते. आणि आमच्या निशब्द आनंदी कृतज्ञतेने कंपायमान होणे हे केवळ अनौपचारिकता आहे.
4. ख्रिस्त आणि त्याच्या कार्याला उंचवा.
ख्रिस्ताला त्याच्या वैभवासाठी आणि त्याच्या साधेपणासाठी उंचवा, त्याच्या दु:खसहनासाठी आणि त्याच्या पुनरुत्थानासाठी, आणि त्याने आमच्याकरिता विकत घेतलेल्या अकल्पनिय श्रीमंतीकरिता त्याला उंचवा. रोम. 8:32, “ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?” निवडलेल्यांना जी प्रत्येक चांगली बाब आतापासून सार्वकालिकतेपर्यंत मिळते ती येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आहे. मी पात्र नाही आणि त्याला त्याची काय किंमत मोजावी लागली हे जाणणे मला माझ्या आनंदातिशयात/ परमानंदात कंपायमान व्हायला लावते.
5. नवीन जन्माबाबत आश्चर्य करा.
शेवटी, आपल्या लोकांना त्यांच्या स्वत:च्या परिवर्तनाच्या चमत्काराबद्दल शिकवा. नव्या जन्माच्या चमत्काराचे गौरव अनुभवाने कोणालाच माहित नाही. आम्हाला शास्त्र लेखांमधून नवीन जन्माचे केवळ आश्चर्य माहित आहे.
“आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने [देवाने]… ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले” (इफिस. 2:4-6)—हे कोणालाच माहित नाही. ही विस्मयकारी वास्तविकता अनुभवाच्या आधारे कोणालाच माहित नाही. आम्हाला ते माहित आहे कारण ते तसे असल्याचे देव आम्हाला सांगतो. आमच्या लोकांना आम्ही शिकवले पाहिजे की ते अलौकिक प्राणी/ जीव आहेत. बहुतांश लोक भक्तिमंदिरात अगदी नैसर्गिक वाटत/ स्वाभाविक वृत्ती ठेवून येतात, बरोबर? त्यांना वेगळे वाटण्यास आपण मदत केली पाहिजे : “तुम्ही एक चमत्कार आहात. तुम्ही मृतांमधून पुनरुत्थित होऊन चालणारे आहात. तुम्ही ह्यापुढे नैसर्गिक/ स्वाभाविक वृत्तीचे नाही. नैसर्गिक / स्वाभाविक वृत्तीच्या लोकांचा एकत्र येण्याचा हा प्रसंग नाही. आमचा विश्वास, जे आमचे जीवन आहे, तो एक चमत्कार आहे. देवाने तो निर्माण केला. तो एक भरवसा आहे. आमचा विश्वास हा सर्वोच्चरीत्या मौल्यवान तारणारा आणि प्रभू ह्यावरील भरवसा आहे.”
असे म्हणण्याचे मी धाडस करू का, ह्याप्रमाणे उपदेश करणे, कालांतराने आपल्या लोकांमध्ये देवाला त्याच्या वचनामध्ये असे भेटण्याचे औत्सुक्य निर्माण करेल की कॉफीचे घोट घेणे हे आपोआपच चुकीचे वाटायला लागेल,?
“तुम्हांला जीवनांत एकच संधी मिळते, बस एवढेच. फक्त एकच. आणि त्या जीवनाचा चिरकाळ टिकणारा मापदंड म्हणजे येशू ख्रिस्त.”
"तुमचे मन यासाठीच बनवले गेलें होते कीं तुम्हीं देवाला ओळखावे आणि त्याजवर प्रीति करावी."
“तुमच्या जीवनातून काहीं तरी पराक्रमी अशी गोष्ट घडून यावीं अशी अपेक्षा करा! तुमच्या आयुष्याला चिरकाळ टिकणारा अर्थ प्राप्त व्हावा अशी उत्कंठा बाळगा. त्यासाठी तहानलेले असां! जीवनाचा प्रवास आवेशविरहित पूर्ण करूं नकां."
"जेव्हां आपण देवामध्यें सर्वात जास्त आनंदी व समाधानी असतो तेव्हां तो आपल्यामध्यें सर्वात जास्त गौरवविला जातो."
“देवाचा देवाकरिता असणारा आवेश आमच्यासाठी असणार्या देवाच्या करुणेचा पाया आहे.”
"भारतातील मंडळीला सत्यात आणि विश्वावासात वाढण्यास सुसज्ज करण्यासाठी पवित्र शास्त्र केंद्रित साहित्याचा अभ्यास करा."