ह्यास्तव तुम्हीं खातां, पितां किंवा जें कांहिं करितां तें सर्व देवाच्या गौरवासाठीं करा. आणि त्याच्याद्वारें देव जो पिता त्याची उपकारस्तुति करा. (1 करिंथ 10:31; कलस्सै 3:17)
जेव्हां तुम्हीं सकाळी उठून त्या दिवसातील घडामोडींना तोंड देता तेव्हां त्या दिवसाकरिता तुमच्या ज्या आशा आहेत त्याविषयी तुम्हीं स्वतःला काय म्हणता? जेव्हां तुम्हीं जगलेल्या दिवसाकडें सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता, तेव्हां त्या दिवशी काय होण्याची तुमची अपेक्षा होती?
जर तुम्हीं म्हणाल, “मी तशाप्रकारे विचारही करीत नाहीं. मी उठतो आणि मला जे करायचे आहे ते करतो,’’ तर मग तुम्हीं स्वतःला कृपेच्या मूलभूत साधनांपासून आणि मार्गदर्शन, शक्तीसामर्थ्य, फलदायीपणा व आनंद ह्यांच्या स्रोतापासून स्वतःला दूर सारता व त्यापासून आपला संबंध तोडून टाकता. बायबलमध्यें या वचनांना समाविष्ट करून अगदी स्पष्टपणें सांगितले आहे कीं आपल्याकरिता देवाची इच्छा अशी आहे कीं आपण आपल्या दिवसाकडें जाणीवपूर्वक विशेष महत्व देऊन एका उद्देशाने त्याकडें पाहावे.
तुमच्याकरिता देवाची प्रकट इच्छा अशी आहे कीं जेव्हां तुम्हीं सकाळी उठता, तेव्हां तुम्हीं दिवसभर ध्येयरहित राहून त्यात वाहून जाऊ नये व तुमच्या थोडक्या परिस्थितींना तुम्हीं काय करावे हे ठरवू न देता किंवा तुमच्या घडामोडींवर त्यांना हावी होऊ न देता तुम्हीं तुमचे लक्ष्य ध्येयावर टिकवून ठेवावे – म्हणजें तुम्हीं एका विशिष्ट प्रकारच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करावे. मी येथे मुलांबद्दल, किशोरवयीन मुलांबद्दल आणि प्रौढांबद्दल बोलत आहे – अविवाहित, विवाहित, विधवा, माता आणि प्रत्येक व्यवहार करणार्या आणि प्रत्येक व्यवसाय करणार्या लोकांबद्दल बोलत आहे.
ध्येयरहित असणें हे निर्जीवतेसारखे आहे. मागील अंगणातील पिवळी मृत झालेंली पाने इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त फिरू शकतात – कुत्र्यापेक्षा जास्त, मुलांपेक्षा ही जास्त. वारा या मार्गाने वाहत आला कीं ते या मार्गाने जातात. वारा त्या मार्गाने वाहत आला कीं ते त्या मार्गाने जातात. ते कोसळतात, ते उसळतात, ते उडी मारता, ते कुंपणावर दाबा मारतात, परंतु त्यांना कोणतेही ध्येय नसते. ते गतीने भरलेले असतात आणि त्यांचे जीवन रिकामे असते.
देवानें मानवांना स्वतःच्या प्रतिरूपात जीवनाच्या मागील अंगणात उडालेल्या निर्जीव पानांप्रमाणें, ध्येयहीन होण्यासाठीं निर्माण केलें नाहीं. त्यानें आपली निर्मिती उद्देशपूर्ण बनण्यासाठीं केली आहे – जेणेंकरून आपण आपल्या सर्व दिवसांकरिता लक्ष्य ठरवावे व प्रत्येक दिवसाकरिता आपलें ध्येय ठरवावे. आज तुमचे ध्येय काय आहे? नवीन वर्षासाठीं तुमचे ध्येय काय आहे? सुरुवात करण्यासाठीं एक चांगली गोष्ट 1 करिंथ 10:31 मध्यें दिली आहे, ‘‘ ह्यास्तव तुम्हीं खातां, पितां किंवा जें कांहिं करितां तें सर्व देवाच्या गौरवासाठीं करा.’’