21 December : पुराणपुरुषाचा जन्म

Alethia4India
Alethia4India
21 December : पुराणपुरुषाचा जन्म
Loading
/

”ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूनेंउत्तर दिलें, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठींजन्मलो आहे व ह्यासाठींजगात आलो आहे कीं, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान 18:37)

हा शास्त्रभाग जरी येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या सुरूवातीस नसून, तर शेवटास येतो, तरी नाताळासंदर्भांत एक उत्तम शास्त्रभाग.

लक्ष द्या : येशू म्हणतो कीं तो केवळ जन्मास आला नाहीं, तर तो “जगात आला आहे.” त्याच्या जन्माचा अद्वितीयपणा हा आहे कीं त्याचा आरंभ त्याच्या जन्माच्या वेळी झाला नाहीं. गव्हाणीत जन्म घेण्यापूर्वीहि तो होता. नासरेथच्या येशूचे व्यक्तिमत्व, चारित्र्य, व्यक्तित्व नासरेथचा पुरुष येशू जन्मास येण्यापूर्वी अस्तित्वात होते.

या रहस्याचे वर्णन करणारा धर्मशास्त्रीय शब्द उत्पत्ति नाहीं, पण देहधारण आहे. शरीर नव्हे, तर व्यक्ती, पण येशूचे हे तात्त्विकदृष्ट्या व्यक्तिमत्व मनुष्य म्हणून त्याच्या जन्मास येण्यापूर्वी अस्तित्वात होते. त्याचा जन्म कोणी नवा व्यक्ती म्हणून अस्तित्वात येणें नव्हते, तर एक सनातनकाळापासून असलेल्या जुन्या व्यक्तीचे जगात येणें होते.

मीखा 5:2 येशूच्या जन्मास येण्याच्या 700 वर्षे आधी, अशाप्रकारे मांडते :

हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्यें तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठीं इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.

येशूच्या जन्माचे रहस्य केवळ हे नाहीं कीं तो कुमारिकेद्वारे जन्मास आला. या अद्भुताचा हेतू देवानें त्याहिपेक्षा मोठ्या अद्भुताची साक्ष देण्यासाठीं ठरविला होता; म्हणजें, नाताळाच्या वेळी जन्मास येणारे बालक असा व्यक्ती होता ज्याचे अस्तित्व “प्राचीन काळापासून, अनादी काळापासून” होते.

आणि, म्हणून, त्याचा जन्म एका विशिष्ट हेतूनें झाला. त्याचा जन्म होण्यापूर्वी त्यानें जन्मास येण्याचा निर्धार केला. त्याच्या पित्यासह त्याची एक योजना होती. आणि त्या मोठ्या योजनेचा भाग तो पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटकेस बोलला: “मी ह्यासाठीं जन्मलो आहे व ह्यासाठीं जगात आलो आहे कीं, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान 18:37).

तो सनातन सत्य होता. तो केवळ सत्य बोलला. तो प्रीतिच्या सर्वात मोठ्या सत्यानें वागला. आणि तो त्याच्या सनातन कुटूंबात त्या सर्वांना एकत्र करीत आहे जे सत्याद्वारें जन्मास येतांत. ही योजना अनादीकाळापासून होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *