“हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले कीं, यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे?” (मत्तय 2:1-2)
लूक नमूद करतो त्याप्रमाणें, मत्तय आम्हांला गव्हाणीत येशूला भेट द्यायला आलेल्या मेंढपाळांविषयी सांगत नाहीं. तो आपला वृत्तांत लगेच विदेशी- परराष्ट्रीय, गैरयहूदी – लोकांकडें वळवितो, जे येशूला दंडवत करण्यासाठीं पूर्वेकडून येतात.
म्हणून, मत्तय त्याच्या शुभवर्तमानाच्या सुरूवातीला आणि शेवटास येशूचे वर्णन केवळ यहूद्यांसाठीं नव्हे, तर सर्व राष्ट्रांसाठीं असलेला वैश्विक मशीहा, ख्रिस्त म्हणून करतो.
येथे आपण जे प्रथम उपासक पाहतो ते राजवाड्यातील जादूगार, अथवा ज्योतिषी, किंवा असें लोक आहेत जे इस्राएलमधून नव्हे, तर पूर्वेकडून आले – कदाचित बॅबीलोनहून आलेले बुद्धीमान लोक आहेत. ते परराष्ट्रीय होते. जुन्या कराराच्या विधिनियमानुसार ते अशुद्ध होते.
आणि मत्तयाच्या शेवटी, येशूचे शेवटचे शब्द आहेत, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेंला आहे. तेव्हां तुम्हीं जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा” (मत्तय 28:18-19).
त्याच्या या आदेशाने आम्हां परराष्ट्रीयांसाठीं ख्रिस्तामध्यें आनंद करण्याचे केवळ दारच उघडले नाहीं, तर त्यानें आपण ख्रिस्त असल्याचा पुरावा देखील दिला, कारण एक भविष्यवाणी वारंवार देण्यांत आलेली होती कीं राष्ट्रे आणि राजे, वस्तुतः, जगाचा राजा म्हणून त्याच्याकडें येतील. उदाहरणार्थ, यशया 60:3 म्हणते, “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडें येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडें येतील.”
म्हणून, मत्तय येशू हाच ख्रिस्त असल्याचा पुरावा देतो आणि दाखवतो कीं तोच ख्रिस्त – राजा, आणि अभिवचन पूर्ण करणारा आहे – फक्त इस्राएलसाठीं नव्हे, तर सर्व राष्ट्रांसाठीं.