6 December : ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती

Alethia4India
Alethia4India
6 December : ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती
Loading
/

“आणि तुम्हांला खूण ही कीं, बाळंत्यानें गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.” इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “ऊर्ध्वलोकीं देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” (लूक 2:12)

कोणासाठीं शांती? देवदूतांच्या स्तुतीगानात एक गंभीर स्वर नादला आहे. पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती. म्हणजें त्या लोकांमध्यें शांती ज्यांच्यावर तो प्रसन्न झाला आहे. पण विश्वासावाचून देवाला प्रसन्न करणें शक्य नाहीं (इब्री 11:6). म्हणून, नाताळाचा उत्सव हा सर्वांसाठीं शांती घेऊन येत नाहीं.  

येशूनें म्हटलें “निवाडा हाच आहे कीं, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती” (योहान 3:19). किंवा म्हाताऱ्या शिमोनाने बाळ येशूला पाहतांना म्हटलें, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणें व पुन्हा उठणें होण्यासाठीं व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठीं ह्याला नेमले आहे; ह्यासाठीं कीं, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत” (लूक 2:34,35). आह, कितीतरी लोक आहेत जे एका उदासवाण्या आणि थंड नाताळाच्या दिवसाची वाट पाहत आहेत आणि त्या पलीकडें तें काहीही पाहत नाहींत – ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह.

“जे त्याचे स्वतःचे2 त्याकडें तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाहीं. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजें त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्‍यांना त्यानें देवाची मुले होण्याचा अधिकार दिला” (योहान 1:11-12). येशू हे शब्द केवळ आपल्या शिष्यांना बोलला, “मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाहीं. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये” (योहान 14:27).

जे लोक देवाच्या शांतीचा आनंद घेतात जी बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडें आहे ते सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवतात (फिलिप्पै 4:6-7).

देवाच्या खजान्याच्या पेटीचे कुलूप उघडणारी किल्ली म्हणजें देवाच्या अभिवचनांवरील विश्वास. म्हणून पौल प्रार्थना करतो, “आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळें तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो” (रोमकरांस 15:13). आणि जेव्हां आपण देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो आणि आनंद व शांती व प्रीतिचा अनुभव घेतो, तेव्हां देवाचे गौरव होते.

ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती! प्रत्येक जण – सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे– जें विश्वास ठेवतील- अशा सर्वांवर.     

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *