27 November : परमेश्वराचा महिमा कसा वर्णावा

Alethia4India
Alethia4India
27 November : परमेश्वराचा महिमा कसा वर्णावा
Loading
/

गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. (स्तोत्र 69:30)

दोन प्रकारचे भिंग आहेत: सूक्ष्मदर्शक भिंग आणि दुर्बिणीचे भिंग. सूक्ष्मदर्शक भिंगामुळें लहान वस्तू तिच्या आकारापेक्षा मोठी दिसते. दुर्बिणीच्या भिंगामुळें मोठी वस्तू तितकींच मोठी दिसते जितकीं मोठी ती प्रत्यक्षात आहे.

जेव्हा दावीद म्हणतो, “त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन,” तेव्हा त्याचा अर्थ असा नाहीं कीं, “मी लहान परमेश्वरास तो जसा आहे त्यापेक्षा मोठा करीन.” याचा अर्थ, “मी मोठ्या परमेश्वराचे गौरव त्यामानाने वर्णीन जितकी मोठी त्याची महती प्रत्यक्षात आहे.”

आम्हास सूक्ष्मदर्शक होण्यासाठीं पाचारण करण्यात आलेंलें नाहीं. आम्हास दुर्बिण होण्यासाठीं पाचारण करण्यांत आलें आहे. ख्रिस्ती लोकांस ठग होण्यासाठीं  बोलावण्यात आलेंलें नाहीं ज्यांना हे माहीत असतांनाहीं कीं त्यांच्या प्रतिस्पर्धीची वस्तू अतिशय उत्तम प्रतीची आहे, ते त्यांची वस्तू तिच्या वास्तविकतेपेक्षा सर्व प्रमाणांनी वाढवितात. परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ कांहींही नाहीं आणि कोणीही नाहीं. आणि म्हणून परमेश्वरावर प्रीति करणाऱ्यांचे पाचारण आहे त्याची महानता इतकीं मोठी दाखविणें जितकीं ती खरोखर आहे.

म्हणूनच आम्हीं अस्तित्वात आहोत, आमचे तारण यासाठींच झालें होते, जसे पेत्र 1 पेत्र 2:9 मध्ये म्हणतो, “पण तुम्हीं तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असें आहात; ह्यासाठीं कीं, ज्यानें तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलें ‘त्याचे गुण तुम्हीं प्रसिद्ध करावेत.’”

ख्रिस्ती व्यक्तीचे संपूर्ण कर्तव्य यां शब्दांत सारगर्भित केलें जाऊ शकते : ओळखा, चिंतन करा, आणि तसेच आपलें आचरण ठेवा  ज्यामुळें परमेश्वर खरोखर जितका थोर आहे तितके थोर त्याला दाखविता यावें. जगासाठीं परमेश्वराच्या गौरवाच्या अमर्याद तारांकित संपत्तीची दुर्बिण बना.

ख्रिस्ती व्यक्तीसाठीं परमेश्वराचे गौरव करण्याचा हाच अर्थ आहे. पण तुम्हीं जे पाहिलें नाहीं अथवा जे तुम्हीं लगेच विसरून जाता त्याची तुम्हीं वाखाणणी करू शकत नाहीं.

यास्तव, आमचे पहिलें काम परमेश्वराची महानता आणि त्याचे चांगुलपण पाहणें आणि ते आठवणीत ठेवणें हे आहे. म्हणून आम्हीं परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, “माझे अंतश्चक्षू प्रकाशित कर!” (इफिस 1:18), आणि आम्हीं आपल्या जीवास उपदेश देतो, “हे माझ्या जिवा, त्याचे सर्व उपकार विसरू नको” (स्तोत्र 103:2).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *