24 November : तुमची आशा हस्तगत करां

Alethia4India
Alethia4India
24 November : तुमची आशा हस्तगत करां
Loading
/

म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वानें दाखवावी ह्या इच्छेनें देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, ह्यासाठीं कीं, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेंली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणें देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगलें उत्तेजन मिळावे. (इब्री 6:17-18)

आपण आपली आशा हस्तगत करून ती आम्हीं दृढ धरून राहावी असें उत्तेजन इब्रीलोकांस पत्राचा लेखक आम्हांला का देतो? जर आमच्या आशेचा अंतिम आनंद आपण येशूच्या रक्ताद्वारे प्राप्त केला आणि मिळवला, तर परमेश्वर आम्हास दृढ धरून राहण्यास का सांगतो?

उत्तर येणेंप्रमाणें आहे :

  • जेव्हा ख्रिस्त मरण पावला तेव्हा त्यानें आमच्यासाठीं जे विकत घेतलें ते म्हणजें आपण दृढ धरून राहण्यापासून मुक्त व्हावें हे नसून, दृढ धरून राहण्याचे सामर्थ्यकारी बळ आहे.
  • त्यानें जे विकत घेतलें ते आमच्या इच्छांस रद्द करणें नव्हते जणूकांहीं आम्हांला दृढ धरून राहण्याची गरज नाहीं, पण आमच्या इच्छांचे सामर्थ्य देणारे परिवर्तन होते यासाठीं कीं आम्हीं दृढ धरून राहाण्याची उत्कंठा बाळगावी.
  • त्यानें जे विकत घेतलें ते दृढ धरून राहण्याची आज्ञा रद्द करणें नव्हते, तर दृढ धरून राहण्याच्या आज्ञेची परिपूर्तता विकत घेतली.
  • त्यानें जे विकत घेतलें ते उपदेशाचे अंत नव्हते, तर उपदेशाचा विजय त्यानें विकत घेतला.

तो यासाठीं मेला कीं तुम्हीं अगदी तेच करावे जे पौल फिलिप्पै 3:12 मध्ये म्हणतो, “ज्यासाठीं ख्रिस्त येशूनें मला आपल्या कह्यात घेतलें ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे.” हा मूर्खपणा नाहीं, ही सुवार्ता आहे, पापी व्यक्तीस ते करावयास सांगणें जे करण्याचे सामर्थ्य केवळ ख्रिस्त त्याला देऊ शकतो; म्हणजें परमेश्वराठायीं आशा.

म्हणून, मी तुम्हांला संपूर्ण अंतःकरणानें असें उत्तेजन देतो : पुढे जा आणि ज्यासाठीं ख्रिस्तानें तुम्हांला आपल्या कह्यात घेतलें आहे ती गोष्ट आपल्या कह्यात घेण्यासाठीं तिच्या मागे लागा. आपल्या संपूर्ण शक्तीनें ती दृढ धरून राहा – जे त्याचे सामर्थ्य आहे, म्हणजें त्यानें आपल्या रक्तानें विकत घेतलेंलें तुमच्यां आज्ञापालनाची देणगी.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *