कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असें आहे. (इब्री 4:12)
देवाचे वचन हीच आमची एकमात्र आशा आहे. देवाच्या अभिवचनांची सुवार्ता आणि त्याच्या न्यायाचे सावधगिरीचे इशारे इतके तीक्ष्ण आणि सजीव आणि सक्रिय आहेत कीं ती माझ्या अंतकरणाच्या तळाशी जातांत आणि मला दाखवतांत की पापाचा खोटेपणा हा खरोखर खोटेपणाच आहे.
गर्भपात माझ्यासाठीं उज्वल भविष्य निर्माण करणार नाहीं. तसेच फसवणूक, अथवा भडकाऊ वस्त्र घालणें, अथवा माझी लैंगिक शुद्धता धुळीस मिळवणें, अथवा कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणाविषयी शांत राहणें, किंवा सोडचिठ्ठी, किंवा सूड घेणें ह्याही गोष्टींनी माझे कसलेच कल्याण होणार नाहीं. आणि या फसवणुकीपासून जर कोणी मला वाचवत असेल तर ते आहे देवाचे वचन.
देवाच्या वचनाचे अभिवचन आमच्या अंतःकरणातील संतोषकारक सुखविलासाप्रमाणें पापाच्या झुरळांवर पहाटेच्या उज्वल सूर्यप्रकाशाची मोठी खिडकी उघडण्यासारखे आहे. परमेश्वराने तुम्हांला तुमचे अंतःकरण कठोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तुम्हांस भुरळ पाडून परमेश्वरापासून दूर नेणाऱ्या आणि विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या पापाच्या खोल फसवणुकीपासून तुमचे रक्षण करण्याकरिता त्याची सुवार्ता, त्याची अभिवचने, त्याचे वचन दिलें आहे.
विश्वासाचे जे सुयुद्ध ते आनंदाने करा. कारण देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आणि कोणत्याही दोधारी तलवारीपेक्षा अधिक तीक्ष्ण आहे. ते पापाच्या कोणत्याही फसवणुकीस भेदून आरपार जाते आणि जे खरोखर मूल्यवान आहे आणि जे खरोखर विश्वास ठेवण्यास पात्र आणि प्रिय आहे ते उघडकीस आणते.