3 November : दु:खें सोसण्यामागचा हेतूं

Alethia4India
Alethia4India
3 November : दु:खें सोसण्यामागचा हेतूं
Loading
/

“ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणें’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असें त्यानें गणलें; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्री 11:26).

आपण दु:खें सोसण्याचा निर्णय घेतो ते केवळ आम्हांस ते सोसावयांस सांगितलें आहे म्हणून नाहीं, परंतु जो आम्हांस ते सोसण्यांस सांगतो तो स्वत: त्यांचे वर्णन सार्वकालिक आनंदाचा मार्ग म्हणून करतो.

आपल्या कर्तव्याप्रत असलेंल्या निष्ठेचे सामर्थ्य प्रगट करण्यासाठीं नव्हे, किंवा आपल्या नैतिक निर्धाराचा जोम प्रकट करण्यासाठीं नव्हे, अथवा दुःख सहन करण्याची आमची पराकाष्ठा सिद्ध करण्यासाठीं नव्हे, तर बालकासारख्या विश्वासात, त्याच्या सर्वसमाधानकारक अभिवचनांची अमर्याद बहुमूल्यता प्रगट करण्यासाठीं तो आम्हास क्लेशांमध्ये आज्ञा पाळणारे होण्यासाठीं पाचारण करतो – त्या सर्वांचे प्रतिफळ म्हणजें त्याच्या स्वतःच्या गौरवाची सर्व-समाधानकारक थोरवी आणि सुंदरता.

”पापाचे क्षणिक सुख भोगणें ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणें हे त्यानें (मोशेनें) पसंत करूंन घेतलें…. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्री 11:25-26). म्हणून, त्याच्या आज्ञापालनानें प्रतिफळास गौरवान्वित केलें – ख्रिस्ताठायीं त्याच्याकरिता परमेश्वर जे कांहीं आहे ते सर्व – केवळ दुःख सहन करण्याचा निर्धार नव्हे.

ख्रिस्ती पूर्णानंदाचा (मुळांत पायपर यांचा विलासवाद म्हणजें आत्म-सुख हेच अंतिम उद्दिष्ट असा सिद्धांत) हा सारांश आहे. विटंबना सोसत आनंदाचा पाठलाग करीत असतांना, आमच्या आनंदाचा जो स्रोत त्याच्या सर्वसमाधानकारक मूल्याची आम्हीं वाखाणणी करतो. आमच्या दुःखाच्या बोगद्याच्या शेवटी उज्वल प्रकाश म्हणून साक्षांत परमेश्वराचे तेज दिसून येते.

क्लेशात आमच्या आनंदाचे लक्ष्य आणि आधार तोच आहे असें जर आम्हीं सांगत नाहीं, तर आमच्या क्लेशाचा अर्थ नाहींसा होईल. अर्थ हा आहे : परमेश्वर हा स्वतः आमचा लाभ आहे. परमेश्वर हांच लाभ आहे. परमेश्वर स्वतः लाभ आहे. आम्हीं जर विटंबना सोसतो त्यामागचा हेतू हाच आहे.

मानव-अस्तित्वाचे मुख्य ध्येय परमेश्वराचा गौरव करणें हा आहे. इतर कुठल्याही गोष्टीच्या तुलनेंत ते क्लेशाबाबत खरे आहे कीं जेव्हां आम्हीं परमेश्वराठायीं सर्वाधिक समाधानी असतो तेव्हां तो आमच्याठायीं सर्वाधिक गौरव पावतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *