ह्या कारणामुळें ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीं तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. (इब्री 2:1)
आपल्यांपैकीं प्रत्येकाला हे ठाऊकच आहे कीं वाहवत जाण्याच्या घटना झाल्यां आहेत. कोणतीही तत्परता नाहीं. दक्षता घेणें नाहीं. लक्ष लावून ऐकणें किंवा ऐकलेल्या गोष्टींवर काळजीपूर्वक विचार करणें नाहीं, कीं येशू ह्याच्यावर आपलें लक्ष केंद्रित करणें नाहीं, आणि परिणामी विश्वासांत टिकाव धरून उभें न राहता त्यांपासून वाहवत जाणें.
येथे तोच मुद्दा आहे : ते विश्वासांत टिकाव धरून राहत नाहींत. जगिक जीवन म्हणजें काहीं सरोवर नाहीं. ते एका नदीप्रमाणें आहे. आणि ते विनाशाकडे वाहवत जात आहे. येशू काय म्हणतो त्याकडे जर तुम्हीं विशेष लक्ष लावत नाहीं आणि प्रती दिवशी त्याजवर चिंतन-मनन करित नाहीं आणि क्षणोक्षणी त्याच्याकडे आपली दृष्टि लावलेली ठेवित नाहीं तर तुम्हीं टिकाव धरणार नाहीं; तुम्हीं मागे जाल. तुम्हीं ख्रिस्तापासून दूर जाल.
वाहवत जाणें ही ख्रिस्ती जीवनासाठीं विनाशकारक गोष्ट आहे. आणि जसे इब्री 2:1 सांगते, यावर एकच उपाय आहे : तुम्हीं ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष लावा. म्हणजेंच, देव त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारें काय म्हणत आहे त्यावर काळजीपूर्वक विचार करा. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारें देव जें बोलत आहे आणि जें करत आहे त्यावर आपले लक्ष केंद्रित करा (किंवा पाहत असावे).
हे कौशल शिकणें म्हणजें नदींत पोहण्यासाठीं हात-पाय मारण्याचे कौशल शिकण्याइतके कठीण नाहीं. फक्त एक गोष्ट जी आपल्याला ह्या पापी संस्कृतीच्या विपरीत दिशेनें पोहण्यास प्रतिरोध करते ती म्हणजें पोहण्यासाठीं हात-पाय मारण्यांस लागणारे परिश्रम नाहीं तर प्रवाहाबरोबर जाण्याची आपली पापी प्रवृत्ती, ही मूळ समस्या आहे.
देवानें आपल्याला कठीण काम दिलें, अशी तक्रार आपण करू नये. ऐका, त्यावर काळजीपूर्वक विचार करा, आपले लक्ष केंद्रित करा (किंवा पाहत असा)— याला तुम्हीं कठीण कामाचे विवरण म्हणू शकत नाहीं. खरे पाहता, हे कामाच्या स्वरूपाचे वर्णन नाहीं. आपण येशूनें केलेंल्या कामामध्यें संतुष्ट असावे यासाठीं हे एक निकडीचे पाचारण आहे जेणेंकरून आपण आपल्या फसव्या इच्छांनी बहकून जाऊ नये.
जर तुम्हीं आज वाहवत जात असाल, तर तुमचा नव्याने जन्म झाला आहे या आशेच्या लक्षणांपैकीं एक म्हणजें हे वाचल्यावर तुम्हांला तुमच्या अं:तकरणात टोचल्यासारखे जाणवत आहे आणि आपण येशूकडे आपली दृष्टि फिरवावी आणि त्याच्याकडे आपलें लक्ष्य केंद्रित करावें आणि दिवसोंदिवस, महिनोन्महिने, आणि वर्षानुवर्षे त्याचे पूर्ण लक्ष देऊन ऐकावें अशी कळकळीची उत्कंठा तुमच्यांत वाढत चालली आहे.