“ह्या मेंढवाड्यातली नाहींत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत……” (योहान 10:16)
जगातील प्रत्येक लोकगटांत देवाचे निवडलेलें लोक आहेत. ज्यां सामर्थ्यानें त्यानें हे विश्व निर्माण केलें त्याच सामर्थ्यानें तो त्यांना सुवार्तेद्वारें हाक मारून बोलावितो, आणि ते विश्वास ठेवतांत! पृथ्वीच्या सीमांवर असलेल्या आव्हानात्मक प्रांतांत नैराश्येवर मात करण्यासाठीं सामर्थ्य मिळावे म्हणून या शब्दांमध्यें किती ताकद आहे!
पीटर कॅमेरॉन स्कॉट यांचा मिशनरी इतिहास या बाबतींत एक चांगले उदाहरण आहे. स्कॉट यांचा जन्म 1867 मध्यें ग्लासगो येथे झाला. त्यांनी आफ्रिका-इनलँड मिशनची स्थापना केलीं. पण आफ्रिकेत सुवार्ता प्रसाराची त्यांची सुरुवात ही मुळीच अनुकूल किंवा आशादायक नव्हतीं.
आफ्रिकेला त्यांचा पहिला प्रवास मलेरियाच्या तीव्र आक्रमणामुळें अर्ध्यावर संपुष्टात आला आणि त्यांना घरी परतावे लागलें. आजारातून बरे होतांच त्यांनी पुन्हां आफ्रिकेला जाण्याचा बेत केला. हा दुसरा प्रवास त्यांच्यासाठीं विशेष समाधान देणारा होता कारण यावेळी त्यांचा भाऊ जॉन सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाला. पण कांहीं दिवसातच जॉन आजारी पडला.
असहाय झालेंल्यां पीटरनें आपल्या भावाला आफ्रिकन भूमीत पुरलें आणि अशा दु:खाच्या प्रसंगी देखील त्यांनी आफ्रिकेत सुवार्ता सांगण्यासाठीं स्वतःला पुन्हा समर्पित केलें. परंतु त्यांची प्रकृती पुन्हा बिघडलीं आणि विवश होऊन त्यांना इंग्लंडला परतावे लागलें.
त्या दिवसांत ते ज्यां उजाडपणा आणि नैराश्यांमुळें विव्हळ झालें त्यांतून ते कसे बाहेर निघणार होते? त्यांनी देवासाठीं समर्पित होण्याचा निश्चय केलेंला होता. पण आफ्रिकेला परत जाण्याचे सामर्थ्य त्यांना कुठून प्राप्त होणार होते? मनुष्याला हे अशक्य होते!
त्यांना हे सामर्थ्य वेस्टमिन्स्टर ॲबे याठिकाणी मिळालें. डेव्हिड लिव्हिंगस्टोनची कबर आजही तिथें आहे. स्कॉट यांनी शांतपणें वेस्टमिन्स्टर ॲबे मध्यें प्रवेश केला, त्यांना ती कबर आढळलीं आणि प्रार्थना करण्यासाठीं त्यांनी कबरेसमोर गुडघे टेकले. त्यावर असा शिलालेख होता:
ह्या मेंढवाड्यातली नाहींत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत
ते एका नव्या आशेनें उत्तुंग होऊन उभें झालें, आणि आफ्रिकेला परतलें. आणि आज, शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही, त्यांनी स्थापन केलेंलीं मिशनरी संस्था आफ्रिकेत सुवार्तेसाठीं संजीवनाचे कार्य करणारे व वाढत चाललेलें कार्यदल आहे.
जर तुम्हांला सर्वात मोठा आनंद देवाच्या भरभरून वाहणाऱ्या कृपेचा अनुभव घेण्यात असेल, कीं जेणेंकरून ती इतरांच्या कल्याणार्थ तुमच्याकडून ओसंडून वाहावी, तर जगातील सर्वात शुभ वृत्त हे आहे कीं देव सुवार्ताविरहित लोकांपर्यंत त्यांच्या तारणानिमित्त पोहोचावे म्हणून तुमच्यासाठीं अशक्य असलेल्यां गोष्टीं तुमच्याठायीं शक्य करील.