“ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.” (निर्गम 34:14)
देव त्याच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीं अफाट ईर्ष्यावान आहे, आणि तो अशा लोकांविरुद्ध भयंकर क्रोधाविष्ठ होऊन त्यांचा न्याय करतो ज्यांचे अंतःकरण त्याच्याठायीं असायला पाहिजे परंतु ते इतर गोष्टींच्या मागे जातांत, जशी कीं एक पत्नी आपला नवरा सोडून दुसऱ्या प्रियकराच्या मागे जाते.
उदाहरणार्थ, यहेज्केल 16:38-40 मध्यें तो विश्वास न ठेवणाऱ्या इस्राएलला म्हणतो,
“जारिणी व रक्तपाती स्त्रिया ह्यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करीन. मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजें ते तुझी कमानदार घरे उद्ध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील; तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडीनागडी करून सोडतील. ते तुझ्याविरुद्ध मंडळी जमवून आणून तुला दगडमार करतील व आपल्या तलवारींनी तुला भोसकतील.”
तुम्हीं ह्या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे आपलें कान लावावे अशी मी तुम्हांला विनंती करतो. तुमची समर्पित प्रीति आणि भक्ती यांसाठीं देवाची ईर्ष्या ही सदैव अंतिम दावा ठरते. ज्यां काहीं गोष्टीं तुम्हांला भ्रामक आकर्षण देऊन देवावरील तुमची प्रीति हिरावून घेतांत त्यां सर्व तुमच्यावर उठून तुम्हांला उद्ध्वस्त करतील.
देवानें तुम्हांला जे जीवन दिलें त्याचा उपयोग तुम्हीं त्या सर्वसमर्थाच्याच विरुद्ध व्यभिचार करण्यासाठीं करावा ही एक भयानक गोष्ट आहे.
परंतु तुमच्यांपैकीं जे खरोखर ख्रिस्ताशी एकरूप झालें आहेत ते तुम्हीं बाकीं सर्व गोष्टींचा त्याग करून केवळ त्याच्याशीच जडून राहण्याचे आणि त्याच्या प्रतिष्ठेसाठीं जीवन जगण्याचे आपलें वचन पाळतां त्यां तुम्हांसाठीं देवाची ईर्ष्या मोठे समाधान आणि मोठी आशा आहे.
कारण कीं देव त्याच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीं अफाट ईर्ष्यावान आहे म्हणून जे काहीं किंवा जो कोणी त्याच्या विश्वासू पत्नीच्या कल्याणासाठीं धोका निर्माण करतो ते सर्व ह्या सर्वसमर्थ देवाचा वैरी ठरते. देवाच्या विश्वासू पत्नीसाठीं, म्हणजें त्याच्या विश्वासू लोकांसाठीं हे शुभवृत्त आहे.
जारकर्म करणाऱ्या आणि आपलीं अं:तकरणने जगाला विकणाऱ्या व देवाबरोबर वैर ठेवणाऱ्या लोकांसाठीं देवाची ईर्ष्या विनाशकारी आहे (याकोब 4:3-4). परंतु जे लोक आपल्या कराराची शपथ पाळतात आणि आपण ह्या जगांत परके आणि प्रवासी आहों असे मान्य करतांत त्यांच्यासाठीं त्याची ईर्ष्या मोठे समाधान आहे.