तुम्हीं माझ्यामध्यें राहिलात व माझी वचने तुमच्यामध्यें राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजें ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्हीं विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्हीं माझे शिष्य व्हाल. . . . माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान 15:7-8,11)
प्रार्थना, या गोष्टीची जाणीव ठेऊन कीं आपल्यां प्रार्थनांच्या उत्तरस्वरूपांत आपण जे फळ देतो त्याद्वारे देवाचा गौरव होतो, येशूबरोबर फळदायक सहभागितेंत असलेल्या आनंदाचा शोध घेते. पण तरी, देवाची मुले आनंद देणाऱ्या ह्या फलदायी प्रार्थनेच्या अखंडित सवयी विकसित करण्यांत वारंवार का अपयशी ठरतात?
जर मी अति शहाणपण दाखविण्याची चूक करित नसेल, तर याची पुष्कळ कारणें असूं शकतांत आणि त्यांपैकीं एक म्हणजें आपल्याला प्रार्थना करण्यांत रस नसतो असे नाहीं, तर आपण तिची योजना करत नाहीं.
जर तुम्हांला चार आठवड्यांची सुट्टी घ्यायची असेल, तर तुम्हीं एक दिवस सकाळी-सकाळी उठून असे म्हणत नाहीं, “चला, आज ऑफिसला जाऊया!” त्यासाठीं तुमची तयारी नसते. तुम्हाला कुठे जायचे हे कळणार नाहीं. काहीही नियोजन केलेंलें नसते.
पण आपल्यांपैकीं बरेच लोक प्रार्थनेला असेच समजतांत. आपण प्रत्येक दिवशी उठतो आणि आपल्यां लक्षात येते कीं अरे, आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग प्रार्थनेची ठराविक वेळ असायला पाहिजे, परंतु प्रार्थना कशाविषयी करावीं यावर आपल्याकडे विषयच नसतो.
कुठून सुरवात करावी हे आपल्याला माहित नसते. कोणतीही योजना केलेंलीं नसते. ठराविक वेळ नाहीं. ठराविक ठिकाण नाहीं. कुठलाही क्रम नाहीं. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे कीं जेथें योग्य योजना असते तेथें प्रार्थना ही खोल अं:तकरणात उत्स्फूर्त अशा अनुभवांचा एक अद्भुत प्रवाह बनते. जेथें योग्य योजना नसते तेथें त्यांच त्यां जुन्या पुनरावृत्ती असतांत.
जर तुम्हीं सुट्ट्यांचा आनंद कुठे आणि कसा घ्यावा याची योग्य योजनाच केलीं नाहीं, तर तुम्हीं कदाचित घरी राहून टीव्ही पाहत बसाल. आध्यात्मिक जीवनाच्या ह्या अशा स्वाभाविक आणि अनियोजित सरावामुळें संजीवनाचा स्तर अधिक खालच्या पातळीवर जातो. आम्हांला नेमून दिलेली धाव धावायची आहे आणि एक युद्ध जिंकायचे आहे. जर तुम्हांला तुमच्या प्रार्थनेच्या जीवनांत एक नवे परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर तुम्हांला ते परिवर्तन मूर्त स्वरूपांत पाहण्यासाठीं तशी योजनाहि करणें आवश्यक आहे.
म्हणून, मीं तुम्हांला सोप्या भाषेंत उत्तेजन देतो : आपण आजच आपला प्राधान्यक्रम आणि त्या क्रमाशी प्रार्थनेची सांगड कशी बसते यांवर पुनर्विचार करण्यासाठीं वेळ काढूया. आपण काहीं नवनवीन संकल्प करूं. देवाच्या सामर्थ्याने काही नवे पराक्रम करण्याचा प्रयत्न करूं. एक ठराविक वेळ साध्य करूं. एक ठिकाण ठरवू. मार्गदर्शनासाठीं पवित्र शास्त्राचा एक भाग निवडा.
स्वतःवर व्यस्त दिवसांची जुलमी हुकुमत चालू देऊन कामाच्या दडपणाखाली येऊ नका. आम्हां सर्वांना आपली दिनचर्या सुधारण्याची गरज आहे. आजचा हा दिवस तो दिवस बनूं द्या जेव्हां तुम्हीं प्रार्थनेच्या नित्यक्रमाकडे वळलांत- जेणेंकरून देवाचा गौरव व्हावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.