“मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन. मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.” (यशया 57:18-19)
मनुष्य हा त्याची बंडखोरी आणि हट्टीपणा या गंभीर रोगाने ग्रस्त असला तरी, देव त्याला बरे करील. त्याला कसे बरे केलें जाईल? यशया 57:15 सांगते कीं देव ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीं वसतो. असे असले तरी, यशया 57:17 मधील लोक हे कांहीं नम्र लोक नाहींत. ते अभिमानी वृत्तीने निर्लज्जपणें आपापल्या मार्गाचे अनुसरण करित आहेत. तर मग, याचा उपचार कसा केला जाईल?
उपचाराचा एकच मार्ग असू शकते. देव त्यांना नम्र करून बरे करील. तो त्याचा अभिमान ठेचून त्यां रुग्णाला बरा करील. ज्यांचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे जर असेच लोक देवाच्या वस्तीचा आनंद घेऊं शकतांत (यशया 57:15), आणि जर इस्राएल बंडखोरी आणि हट्टीपणा या गंभीर रोगाने ग्रस्त आहे (यशया 57:17), आणि जर देवा त्यांना बरे करण्याचे अभिवचन देतो (यशया 57:18), तर मग नम्र करणें हा त्याचा उपचार अनुतापयुक्त हृदय हे त्याचे समाधान असणें आवश्यक आहे.
यिर्मयाने ज्याला नवा करार आणि नव्या हृदयाची देणगी म्हटलें होते त्याच बाबतींत भविष्यवाणी करण्याची ही यशयाची पद्धत नाहीं का? त्यानें म्हटलें, “असे दिवस येत आहेत कीं त्यात इस्राएलाचे घराणें व यहूदाचे घराणें ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन. . . . मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील” (यिर्मया 31:31, 33).
यशया आणि यिर्मया दोघेही असे दिवस येत असल्याचे दर्शन पाहतात जेव्हा रोगग्रस्त, आज्ञा न मानणारे, व पाषाण हृदयी अशा लोकांची अंतर्यामें अलौकिकरित्या बदलून टाकिलें जातील. यशया बरे होण्याविषयी बोलतो, तर यिर्मया त्यांच्या हृत्पटलावर नियमशास्त्र लिहिले जाण्याविषयी बोलतो. आणि यहेज्केल हेच सत्य अशा शब्दांत मांडतो: “मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायीं नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन” (यहेज्केल 36:26)
ह्याप्रमाणें यशया 57:18 चे बरे केलें जाणें हे नव्या हृदय प्रत्यारोपणाचे एक प्रमुख कार्य आहे — पाषाण रुपी जुने, गर्विष्ठ, हट्टी हृदय बाहेर काढले जाते, आणि त्या ठिकाणी एक नवें मऊ, कोमल असे मांसाचे हृदय प्रत्यारोपित केलें जाते, एक अशी शस्त्रक्रिया ज्यामध्यें मागील पाप आणि कायमस्वरूपी असे जे पाप ह्याचे स्मरण देऊन ते सहजपणें नम्र आणि अनुतप्त केलें जाते.
हेंच ते चित्त जेथें तो महाप्रतापी ज्याचे नाव पवित्र आहे सर्वकाळ वस्ती करील.