“ज्या देवानें जग व त्यातले अवघे निर्माण केलें तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीं; आणि त्याला काही उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये 17:24-25)
आपण देवाला त्याच्या गरजां पुरवून त्याचा गौरव करत नाहीं, तर तो आपल्या गरजां पुरवेल अशी प्रार्थना केल्याद्वारे — आणि तो प्रार्थनेचे उत्तर देईल यावर विश्वास ठेविल्याद्वारे, आणि आपण प्रीतिने इतर लोकांच्या सेवेसाठीं आपले जीवन अर्पण करत असताना जो सर्वकाही स्वतः सर्वांना देतो त्या काळजी घेणाऱ्या देवामध्यें असलेल्या आनंदात जीवन जगतो, त्याद्वारे आपण त्याचा गौरव करतो.
येथे आपण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या सुवार्तेचे मर्म पाहतो. आपण साहाय्यासाठीं त्याच्याकडे धावा करावा जेणेंकरून त्याचा गौरव होईल यावर देवाचा जोर. “आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील” (स्तोत्र 50:15). हे सत्य आपल्याला या आश्चर्यकारक तथ्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते कीं त्याला आपली गरज आहे असा विचार करण्यापासून आपण सावध असले पाहिजे. आपल्या हातून देवाची सेवा होते या मानसिकतेपासून आपण सावध असले पाहिजे, याउलट त्याच्या हातून आपली सेवा व्हावीं अशी सावधगिरी आपणच बाळगली पाहिजे, जेणेंकरून आपल्या हातून त्याच्या गौरवाची चोरी होऊं नये. “त्याला काही उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाहीं ” (प्रेषित 17:25).
हे एकूण खूप विचित्र वाटू शकते, कारण आपल्यांपैंकीं पुष्कळांना वाटते कीं देवाची सेवा करणें ही पूर्णपणें सर्वसमान्य गोष्ट आहे. देवाची सेवा केल्यानें त्याचा अपमान देखील होऊ शकतो यावर आपण कधी विचारच केला नाहीं. पण आपण प्रार्थनेच्या मूळ अर्थावरच जर लक्ष दिलें तर ही गोष्ट स्पष्ट होईल.
रॉबिन्सन क्रूसो शीर्षक असलेल्या कादंबरीमध्यें नायक जेव्हां बेटावर अडकतो तेव्हां तो स्तोत्र 50:12-15 ला आपला आवडता शास्त्रपाठ म्हणून स्मरण करतो आणि त्यावर आशा ठवतो : तेथे देव म्हणतो, “मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाहीं, कारण जग व जगातले सर्वकाही माझे आहे. . . . संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.”
याचा अर्थ असा : देवाची सेवा करण्याचा एक असा दृष्टीकोन आहे जो त्याला कमी लेखून त्याच्याकडे आपल्या सेवेचा गरजू व्यक्ती म्हणून पाहतो. ओह, ख्रिस्तामध्यें आम्हांवर प्रकट झालेंल्या देवाच्या पराक्रमी कृपेला आपण कमी लेखू नये याविषयी आपण किती सावध असले पाहिजे. येशूनें म्हटलें , “कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45). तो सेवक होण्यासाठीं आला. देणारा म्हणून आपला गौरव करून घ्यावा हे त्याचे ध्येय होते.