“मीच वेल आहें, तुम्हीं फाटे आहां; जो माझ्यामध्यें राहतो आणि मी ज्याच्यामध्यें राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला कांहीं करितां येत नाहीं.” (योहान 15:5)
कल्पना करा कीं तुम्हीं अर्धांगवायूमुळें पूर्णपणें अंथरूणाला खिळले गेलें आहां आणि फक्त बोलण्यावांचून तुम्हीं स्वतःहून इतर कांहीच करू शकत नाहीं. आणि समजा तुमच्या एका सशक्त आणि विश्वासपात्र मित्रानें तुमच्यासोबत राहून तुम्हाला जे कांहीं करायचे आहे ते सर्व तुमच्यासाठीं करण्याचे वचन दिलें आहे. आता, जर एखादा अनोळखी गृहस्थ तुम्हाला भेटायला आला तर तुम्हीं तुमच्या या मित्राची प्रशंसा-सुमने कशी कराल?
तुम्हीं अंथरुणातून उठून त्याला त्या व्यक्तीच्या समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करून त्याचे औदार्य आणि बळ यांची प्रशंसा-सुमने कराल का? नाहीं! उलट तुम्हीं असे म्हणाल, “मित्रा, तू मला हाथ लावून जरा वर उचलशील, आणि मी माझ्या पाहुण्याकडे पाहू शकेन म्हणून माझ्या मागे उशी ठेवशील का? आणि कृपा करून माझ्या डोळ्यांवर माझा चष्मा सुद्धा लावशील का?
आणि त्यामुळें तुम्हांला भेटायला आलेला गृहस्थ तुमच्या विनंतीवरून जाणेल कीं तुम्हीं असहाय्य आहां आणि तुमचा मित्र सशक्त आणि कनवाळू आहें. तुम्हीं तुमच्या मित्राला गरजेच्या वेळीं हाक मारतां, त्याच्याकडे मदतीसाठीं विनवणी करतां व स्वतःला त्याच्यावर अवलंबून असलेलें दाखवता तेव्हां तुम्हीं त्याची प्रशंसा-सुमने करतां किबहुंना त्याचा गौरवच करतां.
योहान 15:5 मध्यें, येशू म्हणतो, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला कांहीं करितां येत नाहीं.” त्यामुळें आपण खरोखरच अर्धांगवायूच्या व्याधीने ग्रस्त झालो आहोत. ख्रिस्तापासून वेगळे असल्यास आम्हीं ख्रिस्ताचा गौरव होईल असे चांगले ते करण्यास खरोखर सक्षम नाहीं. रोमकरांस 7:18 मध्यें पौल म्हणतो, “माझ्या ठायीं म्हणजें माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाहीं.”
पण योहान 15:5 असेहि म्हणते कीं, ख्रिस्ताचा गौरव होईल असे पुष्कळ जे चांगले ते आपण करावें अशी देवाची आपल्यासंबंधाने इच्छा आहे, म्हणजें हे कीं आपण पुष्कळ फळ द्यावे: “जो माझ्यामध्यें राहतो आणि मी ज्याच्यामध्यें राहतो तो पुष्कळ फळ देतो.” यास्तव आपला शक्तिशाली आणि विश्वासू मित्र या नात्यानें- “मी तुम्हांला मित्र म्हटलें आहें ” (योहान 15:15) – तो आपल्यासाठीं आणि आपल्याद्वारे ते सर्व करण्याचे अभिचचन देतो जे आपण स्वतःहून करूं शकत नाहीं.
मग आपण त्याचा गौरव कसा करतो? योहान 15:7 मध्यें येशू उत्तर देतो : “तुम्हीं माझ्यामध्यें राहिलात व माझी वचनें तुमच्यामध्यें राहिली तर जे कांहीं तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजें ते तुम्हांला प्राप्त होईल.” आम्हीं प्रार्थना करतो! आम्हीं स्वतःहून जे करूं शकत नाहीं -फळ देणें- ते देवानें ख्रिस्ताद्वारे आपल्याठायीं करावे अशी आपण त्याजकडे विनंती करतो.
योहान 15:8 याचे पर्यवसान आहे : “तुम्हीं विपुल फळ दिल्यानें माझ्या पित्याचा गौरव होतो.” आता, प्रार्थनेद्वारे देवाचा गौरव कसा होतो? प्रार्थना ही उघड-उघड कबुली आहे कीं ख्रिस्तापासून वेगळे असल्यास आम्हांला कांहीं करितां येत नाहीं. आणि प्रार्थना म्हणजें असा विश्वास ठेऊन स्वतःकडून देवाकडे वळणें कीं तो गरजेच्या वेळी आपले सहाय्य करील